AUS vs ENG : गारठलेल्या इंग्लंडला सलामीवीराच्या अर्धशतकाची 'ऊब' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zak Crawley Fifty

AUS vs ENG : गारठलेल्या इंग्लंडला सलामीवीराच्या अर्धशतकाची 'ऊब'

Australia vs England The Ashes Series 4th Test Day 5 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) चौथा कसोटी सामना सिडनीच्या मैदानात सुरु आहे. सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडचा (England) सलामीवीर झॅक क्राऊलेनं (Zak Crawley) दमदार अर्धशतक झळकावलं. या मालिकेतील इंग्लंडच्या सलामीराच्या भात्यातून निघालेलं हे पहिल-वहिलं अर्धशतक आहे. त्यामुळे गारठलेल्या इंग्लंड संघाला त्याच्या अर्धशतकानं थोडी ऊब मिळाल्यासारखेच आहे. त्याला ही खेळी शतकामध्ये रुपांतरीत करता आली नाही. कॅमरुन ग्रीननं त्याच्या खेळीला ब्रेक लावला. त्याने 100 चेंडूत 77 धावा केल्या. पाहुणा इंग्लंडची ऑस्ट्रेलियात (Australia vs England) वाताहत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. इंग्लंडच्या या अवस्थेला सलामीवीरांचा फ्लॉप शोही कारणीभूत होता.

ब्रिस्बेनच्या द गाबा स्टेडियमवर रंगलेल्या सलामीच्या सामन्यात रॉय बर्न्स (Rory Burns) आणि हसीब हमीदनं इंग्लंडच्या डावाला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. बर्न्सला या कसोटी सामन्याती पहिल्या डावात खातेही उघडता आला नाही. दुसऱ्या डावात कशाबशा त्याने 27 धावा केल्या. या कसोटी सामन्यात मध्यफळीत डेव्हिड मलान (Malan) (82), आणि जो रुटनं (Root) 89 धावांची खेळी केली. पण इंग्लंडला या सामन्यात 9 विकेट्सन पराभवाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा: सचिन तेंडुलकरबद्दल चुकीची माहिती; अमिताभ बच्चन यांचा माफीनामा

पहिल्या सामन्यातील फ्लॉप शोनंतर इंग्लंडची सलामी जोडी बदलली. अ‍ॅडलडच्या मैदानावर रॉरी बर्न्स आणि हमीद हा नवा प्रयोग आजमावण्यात आला. रॉय बर्न्स आपल्यातील आग दाखवून देऊ शकला नाही. त्याने पहिल्या डावात(Rory Burns) 4 आणि दुसऱ्या डावात 34 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला हसीबनं (Haseeb Hameed) अनुक्रमे 25 आणि 6 धावांची खेळी केली. या सामन्यात डेविड मलान (Malan) 80 आणि जो रुटच्या (Root) 62 भात्यातून अर्धशतक निघाले. पण ऑस्ट्रेलियाने हा सामना 275 धावांनी जिंकून मैदान मारले. तिसऱ्या मेलबर्न कसोटीत इंग्लंडने पुन्हा सलामी जोडी बदलली. बर्न्सच्या जागी झॅक क्राऊलेला संघात स्थान मिळाले. यात त्याला संधीच सोनं करता आलं नाही. पहिल्या डावात 12 आणि दुसऱ्या डावात 5 धावा करण्यात त्याला यश आले. दुसऱ्या बाजूला हसीब हमीदचा शून्य आणि 7 असा फ्लॉप शो कायम राहिला.

हेही वाचा: लंबूजी ईशांतच्या प्रेमाचा किस्सा; बास्केट बॉलच्या मैदानातून फुलली प्रेम कहाणी

चौथ्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने 400 पेक्षा अधिक धावा करुन डाव घोषीत केला. या धावांचा पाठलाग करताना सलामी जोडीनं पुन्हा निराश केले. आघाडी ढेपाळल्यानंतर बेन स्टोक्सचं (Ben Stokes) अर्धशतक आणि जॉनी बेयरस्टोच्या (Jonny Bairstow) शतकी खेळीनं इंग्लंडला थोडेफार अच्छे दिन आले. पण त्यांना 300 चा आकडाही गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 388 धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाअखेर इंग्लंडने बिन बाद 30 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशीच्या खेळात हमीद 9 धावा करुन परतल्यानंतर क्राऊलेनं अर्धशतकी खेळी करुन संघासाठी उपयुक्त खेळी केली. क्राऊलेनं 17 कसोटी सामन्यात आतापर्यंत 5 अर्धशतकासह एक शतक आणि एक द्विशतकही झळकावले आहे. मालिकेतील सलामीवाराची मोठी खेळी इंग्लंडला तारणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top