
New Zealand Vs India 2nd T20I Weather Update : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी 20 सामना पावासमुळे रद्द करण्यात आला. वेलिंग्टनमध्ये नाणेफेक होण्यापूर्वीच पावसाने सुरूवात केली. त्यामुळे एकही चेंडू न खेळवता सामना रद्द करावा लागला. आता रविवारी माऊंट माँगानुई येथे तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी 20 सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार माऊंट माँगानुईमध्ये सामन्याच्या दिवशी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे जर सामना झालाच तर तो कमी षटकांचा होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर हवामान अंदाजानुसार पहिल्या सामन्याप्रमाणे दुसरा सामना देखील पाण्यात वाहून जाण्याची शक्यता देखील दाट आहे.
भारताची Playing 11
शुभमन गिल, इशान किशन, श्रेयस अय्यर / संजू सॅमसन / दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक / हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.
सामन्याची वेळ, लाईव्ह स्ट्रीमिंग, लाईव्ह टेलिकास्ट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी 20 सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता सुरू होईल. या सामन्याचे भारतात DD Sports लाईव्ह प्रक्षेपण करणार आहे. याचबरोबर हा सामना अमेझॉन प्राईंमवर लाईव्ह स्ट्रीम होणार आहे.