PAK vs NZ T20WC22 : पाकिस्तानने गाठली फायनल! महत्वाच्या सामन्यात बाबर - रिझवानची शतकी सलामी

Pakistan Vs New Zealand Semi Final T20 World Cup 2022
Pakistan Vs New Zealand Semi Final T20 World Cup 2022esakal

Pakistan Vs New Zealand Semi Final T20 World Cup 2022 :

टी 20 वर्ल्डकप 2022 च्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 7 विकेट्स राखून पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी 153 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पाकिस्तानने 3 विकेट्स गमावून शेवटच्या षटकात पार केले. कर्णधार बाबर आझमने 53 धावांची तर मोहम्मद रिझवानने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. मोहम्मद हारिसने 30 धावा करत त्यांना चांगली साथ दिली.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना खराब सुरूवातीनंतर डाव सावरत 20 षटकात 4 बाद 152 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने झुंजार अर्धशतक ठोकले. तर कर्णधार केन विलियम्सनने 46 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 2 विकेट्स घेतल्या.

105-1 : बोल्टने जोडी फोडली

बोल्टने बाबरला 53 धावांवर बाद करत ही जोडी 105 धावा झाल्यानंतर फोडली. सामना 45 चेंडूत 48 धावा असा असल्याने न्यूझीलंडला या विकेटनंतर आशेचे किरण दिसू लागले.

PAK 97/0 (11)  : रिझवान - बाबरची दमदार भागीदारी

पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात केल्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने आपली भागीदारी अजून वाढवण्यास सुरूवात केली. या दोघांनी 11 षटकात पाकिस्तानला 97 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, बाबारने आपला गिअर बदलला होता. त्याने 38 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

47-0 (5 Ov) : पाकिस्तानची आक्रमक सुरूवात

न्यूझीलंडचे विजयासाठीचे 153 धावांचे आव्हान घेऊन मैदनात उतरलेल्या पाकिस्तानने 5 षटकात नाबाद 47 धावांपर्यंत मजल मारली. मोहम्मद रिझवानने पहिल्याच षटकात मिळालेल्या जीवनदानाचा चांगला फायदा उचलत आक्रमक फलंदाजी केली.

डॅरेल मिचेलचे दमदार अर्धशतक 

विलियम्सन बाद झाल्यानंतर डॅरेल मिचेलने शेवटच्या षटकात आक्रमक फलंदाजी करत 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर त्याने जेम्स नीशमसोबत संघाला 150 च्या जवळ देखील पोहचवले.

117-4 : केन विलियम्सन अर्धशतकाविनाच परतला

न्यूझीलंडची विलियम्सन आणि मिचेल जोडीने 50 चेंडूत 68 धावांची भागीदारी रचली होती. विलियम्सन 42 चेंडूत 46 धावांची खेळी करून आपल्या अर्धशतकाच्या दिशेने कूच करत होता. मात्र शाहीन आफ्रिदीने त्याचा त्रिफळा उडवत ही जमलेली जोडी फोडली.

विलियम्सन - मिचेलची अर्धशतकी भागीदारी 

न्यूझीलंडच्या 50 धावात तीन फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार केन विलियम्सन आणि डॅेरेल मिचेलने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली.

 49-3 : ग्लेन फिलिप्स स्वस्तात माघारी 

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये शतकी खेळी करणारा ग्लेन फिलिप्स अवघ्या 6 धावांची भर घालून माघारी परतला. त्याला मोहम्मद नवाझने बाद केले.

38-2 (6 Ov) : कॉनवॉय धावबाद 

पहिल्याच षटकात पहिला धक्का बसल्यानंतर कर्णधार केन विलियम्सन आणि डेवॉन कॉनवॉयने पॉवर प्लेमध्ये सावध फलंदाजी करत न्यूझीलंडला चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर कॉनवॉय 21 धावांवर धावबाद झाला.

4-1 : न्यूझीलंडला पहिल्याच षटकात धक्का

अॅलन फिनने शाहिन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली मात्र, पुढच्याच चेंडूवर आफ्रिदीने त्याला पायचित पकडले. परंतु डीआरएसमध्ये फिनच्या बॅटला चेंडू लागल्याचे आढळून आले आणि फिन वाचला. मात्र आफ्रिदीने तिसऱ्या चेंडूवर पुन्हा फिनला पायचित पकडले.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com