esakal | INDvsNZ:'टेलर'नं लावली टीम इंडियाच्या 'विजयाला कात्री'; दुसऱ्या मॅचसह मालिकाही गमावली
sakal

बोलून बातमी शोधा

new zealand won 2nd odi 2020 against india gets winning lead in series

न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतापुढं 274 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान टीम इंडिया पेलू शकेल, असं वाटलं होतं. पण, भारताच्या खेळाची सुरुवातच खराब झाली.

INDvsNZ:'टेलर'नं लावली टीम इंडियाच्या 'विजयाला कात्री'; दुसऱ्या मॅचसह मालिकाही गमावली

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

ऑकलँड (न्यूझीलंड) : पहिल्या मॅचमध्ये जवळपास साडेतीनशे रन्सचा वाचवू न शकलेल्या टीम इंडियाला आज, दुसऱ्या मॅचमध्ये 274 रन्सचं लक्षही गाठता आलं नाही. दुसऱ्या मॅचमध्येही न्यूझीलंडनं दमदार खेळ करून, टीम इंडियाला चारीमुंड्या चीत केलं. न्यूझीलंडनं 22 रन्सनी विजय मिळवला. तीन मॅचची सिरीज न्यूझीलंडनं 2-0 अशी खिशात टाकली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतापुढं 274 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान टीम इंडिया पेलू शकेल, असं वाटलं होतं. पण, भारताच्या खेळाची सुरुवातच खराब झाली. मयांक अगरवाल आणि पृथ्वी शॉ ही ओपनिंग जोडी पुन्हा अपयशी ठरल्यानंतर भारताचा डाव सावरलाच नाही. रन्स चेस करताना कायम चांगला खेळणारा कॅप्टन विराट कोहली फक्त 15 रन्स करू शकला. त्यानंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर चांगली खेळू शकतील, असं वाटत असताना दोघेही खराब फटके मारून बाद झाले. केदार जाधवला आज आपला खेळ दाखवण्याची पुन्हा संधी होती. पण, रन्स चेस करताना त्याच्यावर येणारा दबाव पुन्हा दिसला आणि तोही शॉट सिलेक्शनमध्ये चुकला.

स्पोर्टसच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जडेजाची एकाची झुंज
जडेजानं एका बाजूनं अक्षरशः खिंड लढवली. जडेजाला सैनीनं खूप चांगली साथ दिली. सैनीनं 49 बॉलमध्ये 45 रन्स केल्या. पण, दोघांना विजय साकारता आला नाही. सैनी परतल्यानंतर चहल जडेजाला चांगली साथ देईल, असं वाटत असताना तो दुदैवानं रनआऊट झाला. शेवटी फटकेबाजीच्या नादात जडेजा 55 रन्स वर आऊट झाला आणि न्यूझीलंडनं मॅच 22 रन्सनी जिंकली. 

स्पोर्टसच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

टेलरची झुंजार खेळी 
तत्पूर्वी, न्यूझीलंडचा डाव 200-250 पर्यंत आटोक्यात येईल असे वाटत असताना, रॉस टेलरनं केलेल्या चिवट खेळीच्या जोरावर न्यूझीलंडनं 273 रन्सपर्यंत मजल मारली. एकवेळ 8 आऊट 197 रन्सवर असलेल्या न्यूझीलंडला टेलरनं तारलं. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये त्यानं केलेल्या फटकेबाजीमुळं न्यूझीलंडला भारतापुढं आव्हान उभं करता आलं.  टेलरनं जेमीसनच्या साथीनंनवव्या विकेटसाठी 76 रन्सची पार्टनरशीप केली. ही पार्टनरशीपच खऱ्या अर्थानं भारताच्या पराभवाचं कारण ठरली. भारताकडून टेलरला रोखण्यासाठी कोणतिही रणनिती मैदानावर दिसली नाही अखेर त्याचा फटका टीमला बसला आणि मॅचबरोबर मालिकाही गमवावी लागली. 

Cricket Team India