शिखर धवनची टी 20, कसोटीत संघातून डच्चू दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाला मी... | Shikhar Dhawan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shikhar Dhawan Statement Playing One Format

Shikhar Dhawan : शिखर धवनची टी 20, कसोटीत संघातून डच्चू दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाला मी...

Shikhar Dhawan Statement Playing One Format : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून तीन वनडे सामन्यांची मालिका सुरू झाली. भारतीय संघाचे नेतृत्व 36 वर्षाचा शिखर धवन करत आहे. शिखर धवनने 161 वनडे सामन्यात आतापर्यंत 6 हजार 672 धावा केल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही काळापासून शिखर धवन हा भारताकडून फक्त वनडे क्रिकेट खेळतोय. त्याने अजून आयपीएलमधून निवृत्ती घेतली नसली तरी त्याचा भारताच्या टी 20 आणि कसोटी संघासाठी विचार केला जात नाहीये. याबाबत पहिल्यांदाच शिखर धवनने आपले म्हणणे मांडले.

हेही वाचा: Washington Sundar : फिनिशर कार्तिकला 'सुंदर' कॉम्पिटिशन; वॉशिंग्टनचे स्ट्राईक रेट पाहून जडेजालाही भरली धडकी?

शिखर धवन म्हणाला की, 'तुम्ही गोष्टी कशा घेता हे सर्वस्वी व्यक्ती सापेक्ष असते. मी एकाच फॉरमॅटमध्ये खेळायला मिळते हा आशीर्वाद समजतो. यामुळे मला दुसऱ्या गोष्टी करण्याचा वेळ मिळाला. मी तीन फॉरमॅट खेळत होतो त्यावेळेपेक्षा आता जास्त फ्रेश आणि स्ट्राँग आहे.'

केएल राहुल आणि रोहित शर्मा संघात आल्यानंतर भारतीय टॉप ऑर्डरमध्ये फिट होणे इतके सोपे नाही याची धवनला कल्पना आहे. याचबरोबर शुभमन गिल देखील संघाचे दार ठोठावत आहे. गिल आणि शिखर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत.

हेही वाचा: History of FIFA: खूपच रंजक आहे फुटबॉलचा इतिहास, 'या' राजाने दिले होते खेळाला नाव; वाचा संपूर्ण माहिती

याबाबत शिखर म्हणतो की, 'आम्हाला माहिती आहे की तीन क्रिकेट फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे बरेच खेळाडू संघात आहेत. ही एक चांगली बाब आहे. एकाच फॉरमॅटमध्ये खेळत राहणे हे आव्हानात्मक असते. मात्र मी स्वतःला कायम यासाठी तयार ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मला त्यांच्या वेगाशी जुळवून घ्यावं लागेल. जर असं केलं नाही तर ते चांगलं होणार नाही.'

शिखर म्हणाला की, मी जोपर्यंत खेळत आहे तोपर्यंत कोणती गोष्ट गृहित धरत नाही. त्यामुळे मी सतत कार्यरत राहतो.' शिखर धवनला वनडे संघातली स्थान टिकवण्यासाठी काय करावे लागेल याची पूर्ण कल्पना आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...