Roger Binny Statement On Jasprit Bumrah Injury
Roger Binny Statement On Jasprit Bumrah Injury esakal

Roger Binny : नवे BCCI अध्यक्ष बुमराहचे नाव घेऊन म्हणाले, सर्वात आधी...

Published on

Roger Binny Statement On Jasprit Bumrah Injury : बीसीसीआयच्या मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून रॉजर बिन्नी यांची बिनविरोध निवड करणात आली. रॉजर बिन्नी हे 1983 च्या वर्ल्डकप विजेत्या संघातील सदस्य आहेत. त्यांनी बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष म्हणून आज अधिकृतरित्या सूत्रे हातात घेतली. रॉजर बिन्नी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्या घेतल्या आपण प्रामुख्याने दोन कामे करणार असल्याचे सांगितले.

Roger Binny Statement On Jasprit Bumrah Injury
SL vs UAE | VIDEO : कार्तिक मयप्पन चेन्नईतून पोहचला युएईत! केली लंकेविरूद्ध ऐतिहासिक 'हॅट्ट्रिक'

बीसीसीआयचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी एएनआयशी बोलताना म्हणाले की, 'बीसीसीआय अध्यक्ष म्हणून मी दोन गोष्टींना प्राधान्य देणार आहे. सर्वात पहिल्यांदा मी खेळाडूंना दुखापत कशी होणार नाही हे पाहणार आहे. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने त्याचा फटका वर्ल्डकपच्या सर्व रणनितीवर पडला. दुसरी गोष्ट म्हणजे मी देशातील खेळपट्ट्यांवर देखील लक्ष केंद्रीत करणार आहे.'

रॉजर बिन्नी यांनी भारताकडून 27 कसोटी आणि 72 वनडे सामने खेळले आहेत. अष्टपैलू खेळाडू असलेल्या बिन्नी यांनी 47 कसोटी विकेट्स घेतल्या तर 77 वनडे विकेट्स आपल्या नावावर केल्या. 1983 ला भारताने जिंकलेल्या पहिल्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी 18 विकेट्स घेतल्या होत्या. ते भारताकडून या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज ठरले होते.

Roger Binny Statement On Jasprit Bumrah Injury
Matthew Wade : हो धक्का मारला! ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचा खळबळजनक खुलासा

आज मुंबईत बीसीसीआयच्या 91 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बीसीसीआयच्या नव्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. यात जय शहा यांनी बीसीसीआय सचिव पदाची दुसरी टर्म देण्यात आली. तर भाजप नेते आशिष शेलारांची खजानिस म्हणून निवड करण्यात आली. राजीव शुक्ला हे बीसीसीआयचे उपाध्यक्ष असतील. तर देवाजीत सैकिया हे संयुक्त सचिव असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com