Singapore Open 2022 : सायना नेहवाल जिंकली; कश्यप पहिल्याच फेरीत गारद

Saina Nehwal PV Sindhu advanced In Singapore Open 2022 second Round Parupalli Kashyap Lost
Saina Nehwal PV Sindhu advanced In Singapore Open 2022 second Round Parupalli Kashyap Lostesakal

सिंगापूर : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) अखेर जिंकली. तिने सिंगापूर ओपनच्या पहिल्या फेरीत भारताच्याच मालविका बनसोडचा (Malvika Bansod) पराभव केला. सायना नेहवालने 34 मिनिटे चाललेल्या या सामन्यात बनसोडचा 21-18, 21-15 अशा दोन सरळ गेममध्ये पराभव केला. सामन्याच्या दोन्ही गेममध्ये सायनाने आपले वर्चस्व कायम राखले. ती आता दुसऱ्या फेरीत दाखल झाली आहे.

Saina Nehwal PV Sindhu advanced In Singapore Open 2022 second Round Parupalli Kashyap Lost
आफ्रिदीचं सर्वाधिक षटकारांच वर्ल्ड रेकॉर्ड कोण तोडणार, रोहित की...

दुसऱ्या बाजूला सायना नेहवालचा पती परूपल्ली कश्यपला (Parupalli Kashyap) सिंगापूर ओपनमधील पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडळावा लागला. त्याला इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीने 21-14, 21-15 असे पराभूत केले. यापूर्वी आज ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने देखील सिंगापूर ओपनची सुरूवात विजयाने केली. तिने बेल्जियमच्या लिआने टानचा पहिल्या फेरीत पराभव केला. सिंधूने आपला सामना 21-15, 21-11 असा सरळ गेममध्ये सहज जिंकला.

Saina Nehwal PV Sindhu advanced In Singapore Open 2022 second Round Parupalli Kashyap Lost
T20 लीगसाठी आफ्रिकेची दौऱ्यातून माघार; अश्विन म्हणतो ODI क्रिकेट धोक्यात

दरम्यान, भारताच्या मिथून मंजुनाथने (Mithun Manjunath) देखील विजयी सुरूवात केली. त्याने आपलाच देशबांधव किदंबी श्रीकांतचा पराभव केला. मंजुनाथने पहिला गेम 17-21 असा जिंकत दमदार सुरूवात केली. मात्र दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने जोरदार पुनरागमन करत गेम 21-15 असा जिंकत बरोबरी साधली. सामन्याचा निकाल ठरवणाऱ्या तिसऱ्या गेममध्ये मंजुनाथने पुन्हा कडवी टक्कर देत गेम 18-21 असा जिंकला. भारतीय बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉयने (HS Prannoy) देखील सिंगापूर ओपन 2022 ची विजयी सुरूवात केली. त्याने थायलंडच्या सिथिकोम थाम्मासिनचा 13-21, 16-21 असा पराभव केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com