'पडेल' नेमारची अतिरंजित प्रतिक्रियेची कबुली 

Neymar accept his exaggerated response
Neymar accept his exaggerated response

रिओ डी जानेरो (ब्राझील) : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत मैदानावरील "पडेल' कामगिरीमुळे सोशल मीडियासह अनेक पातळ्यांवर ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेमार याची खिल्ली उडविण्यात आली. अखेर या प्रतिक्रिया अतिरंजित होत्या अशी कबुली त्याला द्यावी लागली. निराशेचा सामना करण्यास अजूनही शिकत असल्याची पुष्टीही त्याने जोडली. 

रशियातील स्पर्धेत नेमारने प्रतिस्पर्ध्याचा किंचितसा धक्का लागताच मैदानावर 'डाइव्ह' मारल्या. काही वेळा तर प्रतिस्पर्धी 'घटनास्थळी' नसतानाही त्याने झोकून दिले. त्याच्या या 'पडेल' कृत्यांची खिल्ली उडविणारी जाहिरातही एका प्रसिद्ध खाद्यपदार्थ उत्पादक कंपनीने केली. 

या पार्श्‍वभूमीवर 'प्रतिमा' आणि 'पत' सावरण्याचा उपाय म्हणून नेमारने दीड मिनिटाचा एक व्हिडिओच पोस्ट केला आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिलेट या प्रायोजक कंपनीने हा व्हिडिओ बनविला आहे. त्यात नेमारने म्हटले आहे, की 'काही वेळा माझ्या पोटरीला प्रतिस्पर्ध्याचे स्टड लागतात, काही वेळा पाठीत गुडघ्याचा आघात होतो, तर काही वेळा पायावर प्रहार केला जातो. मी अवास्तव प्रतिक्रिया व्यक्त करतो असे तुम्हाला वाटू शकेल आणि काही वेळा मी तसे करतोसुद्धा; पण मैदानावर मला भोगावे लागते ही वस्तुस्थिती आहे.' 

नेमारने या वक्तव्याद्वारे चाहत्यांची सहानुभूती पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने चाहत्यांना उद्देशून म्हटले आहे की, 'तुमची टीका स्वीकारण्यास मला वेळ लागतो. आरशात पाहून स्वतःचे परीक्षण करण्यास आणि नवा माणूस म्हणून परिवर्तन करण्यास मला वेळ लागतो, पण मी नव्या चेहऱ्याने आणि खुल्या दिलाने येथे आलो आहे. मी खाली पडलो आहे, पण जे पडतात तेच सावरून उठतात.' 

माझ्यात एक लहान मूल दडले आहे. काही वेळा ते जगाला मोहित करते, तर काही वेळा डिवचते. मी उद्धट वागतो तेव्हा मी बिघडलेला मुलगा असतो असे नाही, तर मी निराशेवर मात करण्यास अद्याप शिकलेलो नाही. तुम्ही माझ्यावर दगड टाकू शकता किंवा तेच दुसरीकडे फेकून देऊन मला सावरण्यास मदत करू शकता. मी जेव्हा माझ्या दोन पायांवर उभा राहतो तेव्हा सारा ब्राझील माझ्या पाठीशी उभा राहतो. 
- नेमार 

व्हिडिओसाठी क्‍लिक करा 
www.sakalsports.com 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com