नेमार अर्जेंटिनाविरुद्धच्या पात्रता सामन्‍याला मुकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेमार अर्जेंटिनाविरुद्धच्या पात्रता सामन्‍याला मुकणार

नेमार अर्जेंटिनाविरुद्धच्या पात्रता सामन्‍याला मुकणार

ब्युनोस आयर्स : ब्राझीलचा फॉरवर्ड नेमार मांडीच्या दुखापतीमुळे अर्जेंटिनाविरुद्धच्या २०२२ फिफा विश्वकरंडक पात्रता फेरीला मुकणार आहे. याबद्दलची माहिती ब्राझिलियन फुटबॉल कॉन्फेडरेशनने (सीबीएफ) पत्रकाद्वारे दिली आहे. मंगळवारी सॅन जुआन शहरात झालेल्या संघर्षपूर्ण सामन्यात २९ वर्षीय नेमारच्या डाव्या मांडीच्या स्नायूंत वेदना जाणवू लागल्याने तो सामन्याबाहेर पडला होता.

‘‘नेमार ज्युनिअर त्याच्या मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे सध्या त्रस्त असून याचदरम्यान त्याच्या अनेक तपासण्या होणार असल्याने तो अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्याला उपलब्ध असणार नाही,’’ असे सीबीएफने निवेदनात म्हटले आहे. दुखापतग्रस्त असलेला अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्सी मात्र सदर सामन्यासाठी तंदुरुस्त असल्याची माहिती संघ व्यवस्थापनाने दिली आहे.

loading image
go to top