Neymar : ब्राझीलचा स्टार नेमार खेळणार पुण्यात; मुंबई सिटीविरूद्ध बालेवाडीत रंगणार सामना

Neymar AFC Champions League
Neymar AFC Champions Leagueesakal

Neymar AFC Champions League : ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने नुकतेच पीएसजी सोडून अल - हिलाल या फुटबॉल क्लबशी करार केला आहे. याचा मोठा फायदा भारतीय फुटबॉल चाहत्यांना होण्याची शक्यता आहे. कारण एशियन फुटबॉल क्लब चॅम्पियन्स लीग स्पर्धेत अल - हिलाल आणि भारताचा एकमेव क्लब मुंबई सिटी एफसी हे एकाच ग्रुप डी मध्ये आहेत.

Neymar AFC Champions League
Chess World Cup Final : प्रग्नानंद आहे सुवर्णसंधी! कसा खेळला जातो बुद्धीबळाचा टाय ब्रेकर?

मुंबई सिटी एफसी आणि नेमारचा अल - हिलाल हा क्लब एकाच ग्रुपमध्ये असल्याने नेमार हा मुंबई सिटी एफसी विरूद्धचा सामना खेळण्यासाठी भारतात येण्याची शक्यता आहे. मुंबई सिटी एफसीचा सामना हा त्यांच्या होम ग्राऊंडवर होणार आहे. मुंबई एफसीचे श्री शिवछत्रपती बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे होम ग्राऊंड असल्याने पुणेकरांना नेमारला खेळताना पाहण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.

Neymar AFC Champions League
Neeraj Chopra : लक्ष्य 90 मीटर! वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नीरजकडून सुवर्ण पदकाची आशा; कधी अन् कुठं पाहायचा लाईव्ह सामना?

यापूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पुण्यात खेळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ख्रिस्तियानो रोनाल्डोचा क्लब अल - नासरचा AFC Champions League च्या ग्रुप E मध्ये समाविष्ट आहे. नियमानुसार एकाच देशातील दोन संघ हे एकाच ग्रुपमध्ये समाविष्ट केले जात नाहीत.

एशियन चॅम्पियन्स लीगचे ग्रुप स्टेजमधील सामने हे 18 सप्टेंबपरासून सुरू होणार आहे. मात्र अल - हिलालचा भारतातील सामना कधी होणार आहे हे अजून जाहीर झालेले नाही. कारण सामन्यांचे अंतिम वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही.

Neymar AFC Champions League
UWW vs WFI : जागतिक कुस्ती महासंघाने दिला मोठा धक्का! भारतीय कुस्ती महासंघाची सदस्यत्व रद्द

नेमारने नुकतेच अल - हिलालकडे ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याला 97.8 मिलियन डॉलर्स एवढी गलेलठ्ठ रक्कम मिळाली आहे. या संघात कलिडोऊ, रूबेन नेवेस आणि माल्कॉम ही मोठी नावे देखील आहेत.

या संघाचे प्रशिक्षक पोर्तुगालचे जॉर्ज जेसस हे आहेत. जेसस हे भारतात येणाऱ्या आपल्या संघात नेमारचा समावेश करतात का हे पहावे लागेल.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com