

Neymar
esakal
रियो दी जेनेरियो: नेमार ज्युनियर याचे तब्बल तीन वर्षांनंतर ब्राझीलच्या फुटबॉल संघात पुनरागमन करण्यात आले आहे. ११ जून ते १९ जुलै यादरम्यान अमेरिका, कॅनडा व मेक्सिको येथे फुटबॉल विश्वकरंडकाचा थरार रंगणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी ब्राझीलच्या संघाची घोषणा करण्यात आली. मुख्य प्रशिक्षक कार्लो अँसीलोटी यांनी ब्राझीलच्या २६ खेळाडूंच्या नावांवर शिक्कामोर्तब केले.