
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनने अचानक निवृत्ती जाहीर केल्यानं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. पूरनने अवघ्या २९ व्या वर्षी निवृत्ती जाहीर केलीय. सोशल मीडियावर निकोलस पूरनने त्याच्या निवृत्तीबाबत पोस्ट केलीय. निवृत्ती घेण्याचा निर्णय कठीण होता असं त्यानं म्हटलंय.