
भारतीची महिला बॉक्सर निखात झरीनने (Nikhat Zareen) महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या (Women's World Boxing Championships) फायनल मध्ये 52 किलो वजनी गटात थायलंडची बॉक्सर जितपॉन्ग जुटामासचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे.
फायनलमध्ये प्रवेश करताना तिने ब्राझीलच्या कॅरोलिन डे अल्मैडाचा पराभव केला. हा सामना इस्तांबूलमध्ये झाला होता. झरीन ही माजी ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियन आहे. 52 किलो वजनीगटातील सामन्यात तिने शांत चित्ताने प्रतिस्पर्धी बॉक्सर कॅरोलिनवर निर्विवाद वर्चस्व गाजवले होते आणि तिने सामना 5-0 अशा एकतर्फी जिंकला.
सहा वेळची विजेती मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएळ आणि लेखा सी या भारतीय बॉक्सरनी आतापर्यंत वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. आता हैदराबादच्या झरीनला देखील या यादीत आपले नाव कोरण्याची संधी निर्माण झाली आहे. या स्पर्धेत भारताने 2006 मध्ये सर्वात चांगली कामगिरी केली होती. त्यावेळी भारताने आठ पदकांची कामाई केली होती. यात चार सुवर्ण आणि एक रौप्य तर तीन कांस्य पदकांचा समावेश होता.
गतवर्षी भारताच्या चार बॉक्सरनी पदक जिंकले होते. यात मंजू राणीने रौप्य मेरी कोमने कांस्य पदक जिंकून आपले वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील आठवे पदक नावार केले होते.