

India-Born Nikhil Chaudhary Makes History with Australian Team Selection
sakal
सिडनी: तब्बल सहा दशकांनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये भारतात जन्मलेल्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू खेळाडू निखिल चौधरी याला ऑस्ट्रेलियाच्या टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात त्याला स्थान देण्यात आले आहे.