Nikhil Chaudhary Rape Case : कारमध्ये महिलेवर बलात्कार... IPL सुरू असताना भारतीय क्रिकेटपटूवर गुन्हा दाखल

Nikhil Chaudhary Australian Women Rape Case : संपूर्ण देशातील क्रिकेटच्या चाहत्यांवर आयपीएल 2024 चा रंग चढला आहे. मात्र याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.
Nikhil Chaudhary Rape Case
Nikhil Chaudhary Rape Casesakal

Nikhil Chaudhary Rape Case : संपूर्ण देशातील क्रिकेटच्या चाहत्यांवर आयपीएल 2024 चा रंग चढला आहे. मात्र याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय वंशाचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूवर एका ऑस्ट्रेलियन महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे.

या क्रिकेटपटूने स्वत:ला निर्दोष घोषित केले असले तरी. मात्र आता तो अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. भारतीय वंशाच्या या क्रिकेटपटूने यावेळी बिग बॅश लीगमध्ये आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Nikhil Chaudhary Rape Case
IPL 2024 : रोहित शर्माला पुन्हा होणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार? माजी दिग्गजांचे मोठे विधान

बिग बॅश लीग 2023-24 मध्ये तुफानी खेळी करणारा भारतीय वंशाचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर निखिल चौधरी याच्यावर एका ऑस्ट्रेलियन महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे.

रिपोर्टनुसार, निखिल चौधरी एका क्लबमध्ये एका महिलेला भेटला, त्यानंतर त्याने तिला आपल्या कारमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. मात्र, निखिल चौधरीच्या वतीने हे आरोप खोटे आणि चुकीचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

Nikhil Chaudhary Rape Case
Ind vs Aus Test Series 2024-25 Schedule : टीम इंडियाच्या नवीन मालिकेची घोषणा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कधी रंगणार कसोटीचा थरार? जाणून घ्या शेड्युल

निखिल चौधरीचा जन्म भारतातील पंजाबमध्ये झाला आहे. निखिल पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेटही खेळला आहे, पण आता तो ऑस्ट्रेलियाकडून खेळतो. आता तो ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित टी-20 लीग बॅग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्स संघाकडून क्रिकेट खेळतो.

निखिलला अद्याप ऑस्ट्रेलियासाठी राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. निखिल चौधरीने बिग बॅश लीगमध्ये आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. या काळात त्याने 6 डावात फलंदाजी केली. यादरम्यान निखिलने 154 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजी करताना 5 विकेट्सही घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com