The Ashes: ॲशेस मालिकेत भारताचा डंका! विराट कोहलीचा शत्रू करणार अंपायरिंग

अंपायर नितीन मेननचे स्वप्न साकार!
The Ashes Nitin Menon
The Ashes Nitin Menonsakal

The Ashes Nitin Menon : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये समावेश होणारा एकमेव भारतीय असलेल्या नितीन मेननचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. नितीन मेननला जून-जुलैमध्ये इंग्लंडमध्ये प्रतिष्ठेच्या अॅशेसमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. इंदूर-स्थित नितीन मेनन हे 16 जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेत मैदानी पंच म्हणून काम पाहतील.

The Ashes Nitin Menon
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचं ते वागणं चाहत्यांना खटकलं; नेमकं काय घडलं वाचा?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, "नितीन मेनन ॲशेसमध्ये कामगिरी करेल." तिसरी कसोटी लीड्स येथे 6 ते 10 जुलै दरम्यान आणि चौथी कसोटी 19 ते 23 जुलै दरम्यान मँचेस्टर येथे खेळल्या जाणार आहे. लंडनमध्ये खेळल्या जाणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीसाठी नितीन मेनन टीव्ही अंपायर असतील.

बॉर्डर-गावसकर सीरीजच्या दुसऱ्या दिल्ली कसोटीत विराट कोहली वादग्रस्त पद्धतीने आऊट झाला होता. कुहनेमनच्या बॉलिंगवर विराट कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आलं. विराट बाद देण्याचा निर्णय नितीन मेनन यांनी घेतला होता. त्यानंतर त्यांनी डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये थर्ड अंपायर चेंडू पहिला बॅटवर लागला की, पॅडवर हे ठरवू शकले नाहीत. त्यानंतर थर्ड अंपायरने मैदानावरील पंच नितीन मेनन यांच्या निर्णयाच समर्थन केल. अशा अनेक वेळा विराट कोहलीला त्यांनी आऊट दिले आहे.

The Ashes Nitin Menon
IPL 2023: केवळ ८ शब्द अन्...विराटने केली कविता, Video Viral

नितीन मेनन 2020 च्या अ‍ॅशेसमध्येही अंपायरिंग करू शकले असते, परंतु नंतर कोरोना महामारीमुळे केवळ स्थानिक पंचांची निवड करण्यात आली. नितीन मेनन लीड्स आणि मँचेस्टरच्या मैदानावर अनुक्रमे श्रीलंकेचा कुमार धर्मसेना आणि त्रिनिदादचा जोएल विल्सन यांच्यासोबत भागीदारी करतील. नितीन मेननचा 2020 मध्ये आयसीसी पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला होता.

The Ashes Nitin Menon
Team India: कारकीर्द संपली असं होतं वाटत... पण टीम इंडियामध्ये 'या' खेळाडूची WTC फायनलमध्ये एंट्री!

एलिट पॅनलमध्ये बढती मिळाल्यानंतर नितीन मेनन यांनी पीटीआयला सांगितले की, माझ्या स्वप्नातील मालिका अॅशेस असेल यात शंका नाही. मी टीव्हीवर पाहणारी ही एकमेव मालिका आहे. ती मालिका ज्या वातावरणात खेळली जाते, मग ती इंग्लंड असो की ऑस्ट्रेलिया, मला त्यात सहभागी व्हायचे आहे. मला त्याचा एक भाग व्हायला आवडेल.

नितीन मेनन यांनी आतापर्यंत 18 कसोटी, 42 एकदिवसीय आणि 40 टी-20 सामन्यांमध्ये अंपायरिंग केले आहे. तो सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. अॅशेससाठी तटस्थ पंचांची निवड करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com