Rinku Singh Team India T20 Squad : वाईट दिवस... रिंकूला डावलले, खास मित्र स्टेटस ठेवत म्हणाला...

Rinku Singh Nitish Rana Team India T20 Squad
Rinku Singh Nitish Rana Team India T20 Squad esakal

Rinku Singh Nitish Rana Team India T20 Squad : बीसीसीआयने वेस्ट इंडीज दौऱ्यावरील टी 20 मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली. वेस्ट इंडीजमध्ये भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व हे हार्दिक पांड्याच करणार असून संघात राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जैसवाल, मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्मा यांना पदार्पणाची संधी मिळाली आहे. मात्र केकेआरच्या रिंकू सिंहला संघात स्थान मिळवता आलेले नाही.

Rinku Singh Nitish Rana Team India T20 Squad
Ind vs Wi Virat Kohli : तोच चेंडू, तीच चूक! सराव सामन्यातही कोहली खाली मुंडी घालून..., Video व्हायरल

रिंकूला विंडीज दौऱ्यावर संधी न मिळाल्याने चाहते नाराज झाले असून सोशल मीडियावर याबाबत ते आपले मत व्यक्त करत आहेत. रिंकून गेल्या आयपीएल हंगामात मॅच फिनिशरची भुमिका चोख निभावली होती. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळेल अशी आशा होती. मात्र त्याची निवड न होण्याने निराशा झाली. आता याबाबत केकेआरचा कर्णधार आणि त्याचा जवळचा मित्र नितीश राणाने एक गूढ पोस्ट शेअर केली.

केकेआरकडून खेळणारा रिंकू सिंह आयपीएलमध्ये 5 व्या क्रमांकावर फलंदाजी करतो. यंदाच्या हंगामात त्याने काही अविश्वसनीय सामने फिनिश करून दाखवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. यानंतर रिंकू सिंहला भारतीय संघात संधी मिळेल.

विंडीज दौऱ्यावर भारताचा युवा संघ टी 20 मालिका खेळणार आहे. यात रिंकूचा देखील समावेश होईल अशी आशा होती. मात्र रिंकू सिंह, जितेश शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांना संघात स्थान मिळाले नाही.

Rinku Singh Nitish Rana Team India T20 Squad
Rinku Singh Ruturaj Gaikwad : रिंकू - ऋतुसाठी निवडसमितीचं मोठं प्लॅनिंग; थेट चीनलाच पाठवणार

भारताचा विंडीज दौऱ्यासाठीचा टी 20 संघ :

इशान किशन, शुभमन गिल, यशस्वी जैसवाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com