Olympic Qualifiers : ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी कुस्ती संघात बदल नाही ; चाचणी घेण्यासाठी वेळेचा अभाव

इस्तंबुल येथे ९ ते १३ मेदरम्यान पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्रता फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. ऑलिंपिकचा कोटा मिळवण्याची ही अखेरची संधी असणार आहे. भारतीय कुस्ती संघटनेकडून या स्पर्धेसाठी सोमवारी संघाची निवड करण्यात आली. बिशकेक येथे झालेल्या आशियाई पात्रता फेरीसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंनाच इस्तंबुल येथे होत असलेल्या स्पर्धेसाठी संधी देण्यात आली आहे.
Olympic Qualifiers
Olympic Qualifierssakal

नवी दिल्ली : इस्तंबुल येथे ९ ते १३ मेदरम्यान पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्रता फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. ऑलिंपिकचा कोटा मिळवण्याची ही अखेरची संधी असणार आहे. भारतीय कुस्ती संघटनेकडून या स्पर्धेसाठी सोमवारी संघाची निवड करण्यात आली. बिशकेक येथे झालेल्या आशियाई पात्रता फेरीसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंनाच इस्तंबुल येथे होत असलेल्या स्पर्धेसाठी संधी देण्यात आली आहे. चाचणी घेण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.

इस्तंबुल येथे आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी तीन कुस्तीपटूंना वगळण्यात आले आहे. विनेश फोगाट (५० किलो वजनी गट), अंशू मलिक (५७ किलो वजनी गट) व रितिका (७६ किलो वजनी गट) या तीन खेळाडूंची निवड करण्यात आलेली नाही. किर्गीस्तान येथील बिशकेक येथे झालेल्या आशियाई पात्रता फेरीच्या स्पर्धेत या तीनही खेळाडूंनी पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवला असल्यामुळे त्यांची निवड करण्यात आलेली नाही.

वजन कमी करण्याचे आव्हान

भारतीय कुस्ती संघटनेच्या सूत्रांकडून याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले की, भारतीय पुरुष कुस्तीपटूंकडून पात्रता फेरीत सुमार कामगिरी झाली. त्यामुळे नव्याने चाचणी घेण्यात येण्याची योजना होती; पण पुरेसा वेळ नव्हता. बिशकेक व इस्तंबुल अशा दोन पात्रता फेरीच्या स्पर्धांमध्ये पुरेसा अवधी नव्हता. तसेत खेळाडूंना निवड चाचणीसाठी वजन कमी करावे लागते. त्यानंतर मुख्य स्पर्धेसाठीही वजन कमी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असते. या कारणामुळे नव्याने चाचणी घेण्यात आली नाही.

कोटा मिळवण्याची सुवर्णसंधी

भारतीय कुस्तीपटूंकडे इस्तंबुल येथे होत असलेल्या पात्रता फेरीत पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवण्याची सुवर्णसंधी असणार आहे. एकूण ५४ ऑलिंपिक कोटा या स्पर्धेने मिळणार आहेत. प्रत्येक वजनी गटात तीन खेळाडूंना ऑलिंपिक कोटा मिळवता येणार आहे. प्रत्येक वजनी गटात अंतिम फेरीत पोहोचणारे दोन कुस्तीपटू व ब्राँझपदकाच्या लढतीत विजयी होणारा कुस्तीपटू अशा तीन खेळाडूंना ऑलिंपिक कोटा मिळवता येणार आहे.

Olympic Qualifiers
LSG vs MI: लखनौविरुद्ध सामन्याआधी मुंबईचं टेंशन वाढलं! IPL 2024 मधील सर्वात वेगवान गोलंदाज पुनरागमनासाठी सज्ज

भारतीय कुस्ती संघ : फ्रीस्टाईल - अमन (५७ किलो वजनी गट), सुजीत (६५ किलो वजनी गट), जयदीप (७४ किलो वजनी गट), दीपक पुनिया (८६ किलो वजनी गट), दीपक (९७ किलो वजनी गट), सुमीत (१२५ किलो वजनी गट). ग्रीको रोमन - सुमीत (६० किलो वजनी गट), आशू (६७ किलो वजनी गट), विकास (७७ किलो वजनी गट), सुनीलकुमार (८७ किलो वजनी गट), नितेश (९७ किलो वजनी गट), नवीन (१३० किलो वजनी गट). महिला - मानसी (६२ किलो वजनी गट), निशा (६८ किलो वजनी गट).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com