ICC T-20 संघात भारताचा एकही खेळाडू नाही

Virat Kohli ICC
Virat Kohli ICC

दुबई : आयसीसीकडून बुधवारी २०२१ मधील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० संघांची निवड करण्यात आली. यामध्ये भारताच्या एकाही क्रिकेटपटूला स्थान देण्यात आलेले नाही. पाकिस्तानचा बाबर आझमकडे या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. (No Indian Player in ICCs Team of The Tournament Babar Azam)

Virat Kohli ICC
SA vs IND : टीम इंडियाच्या पराभवामागची पाच प्रमुख कारण...

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाला ट्वेन्टी-२० विश्‍वकरंडकात साखळी फेरीच्या लढतीतच गारद व्हावे लागले होते. या निराशाजनक कामगिरीचा फटका भारतीय क्रिकेटपटूंना यावेळी बसला.

तर दुसरीकडे बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानने ट्वेन्टी-२० विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. शिवाय त्याने २०२१ मधील २९ सामन्यांमध्ये ३७.५६च्या सरासरीने ९३९ धावांचा पाऊस पाडला. यामध्ये एक शतक व नऊ अर्धशतकांचा समावेश होता.

Virat Kohli ICC
VIDEO : कॅप्टनचा खेळाडू झाला; पण कोहलीचा स्वभाव नाही बदलला!

आयसीसीकडून निवडण्यात आलेल्या या संघात पाकिस्तानच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये बाबर, महम्मद रिझवान व शाहीन आफ्रिदीचा समावेश आहे. तसेच मिचेल मार्श व जोश हेझलवूड या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही यामध्ये स्थान देण्यात आले आहे.

आयसीसीची ट्वेन्टी-२० संघ : जोस बटलर, महम्मद रिझवान, बाबर आझम, एडन मार्करम, मिचेल मार्श, डेव्हीड मिलर, तबरेझ शम्सी, जोश हेझलवूड, वनींदू हसारंगा, मुस्तफिजुर रहमान, शाहीन आफ्रिदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com