esakal | फायनलचा दबाव नाही, आनंद घ्यायचाय - विराट कोहली
sakal

बोलून बातमी शोधा

फायनलचा दबाव नाही, आनंद घ्यायचाय - विराट कोहली

फायनलचा दबाव नाही, आनंद घ्यायचाय - विराट कोहली

sakal_logo
By
नामदेव कुंभार

India Tour of England 2021 : विलगीकरणाचा कालावधी पुर्ण केल्यानंतर मुंबईमधून भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना झाला आहे. इंग्लंडला जाण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा दबाव आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना विराट कोहली म्हणाला की, 'अतिंम सामन्याचा कोणताही दबाव नाही. कसोटी हा क्रिकेटचा आव्हानात्मक प्रकार असल्याचं माहित आहे. म्हणून या सामन्यात आम्हाला फायनलाचा आनंद घ्यायचा आहे.'

इंग्लंडमध्ये पोहचल्यानंतर भारतीय संघ दहा दिवस विलगीकरणात राहणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला सराव करण्याची परवानगी देण्यात आली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (World Test Championship final) रंगणार आहे. इंग्लंडच्या मैदानातील मेगा फायनलनंतर भारतीय संघ इंग्लंड (England) विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

हेही वाचा: 'मिशन WTC'; भारतीय संघ इंग्लंडला रवाना

इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना कोहली म्हणाला की, कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना अचानक आलेला नाही. भारतीय संघाने दोन वर्ष सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळले म्हणून ही कमावली. आण्ही कसोटी क्रिकेट मनापासून खेळतो . हा क्रिकेटचा सर्वात आव्हानात्मक प्रकार असल्याचं जाणतो, म्हणून या सामन्यात सहभागी होण्याची मजा आहे. आम्हाला दडपण तर सोडाच या फायनचा आनंद घ्यायचाय.

हेही वाचा: WTC Final कोण जिंकणार? रिचर्ड हेडलींचं भाकीत

प्रतिस्पर्धी इंग्लंडचा संघ फायनल आधी दोन कसोटी सामने खेळणार आहे. भारतीय संघ मात्र फक्त मैदानावर सराव करुन अंतिम सामन्यासाठी उतरणार आहे. आमच्या सर्व खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. सरवा आणि तयारी या गोष्टी मनात जास्त असतात. आम्ही मनातून तयार आहोत, कणखर आहोत, असं विराट कोहलीनं सांगितलं.

मानसिक थकवा...लगेचच सांगा - विराट

कोणालाच मैदान ते हॉटेल आणि हॉटेल ते मैदान जगून सर्वोत्तम खेळ सातत्यानं करणं शक्य होणार नाही. खेळाडूंना आम्ही विश्वासात गेऊन सांगत आहोत, की कोणाला मानसिक थकवा जाणवू लागला तर लगेच सांगा आणि छोटी विश्रांती घेऊन परत या, असं विराट म्हणाला.

loading image