esakal | IPL 2021 : मॉर्गन-त्रिपाठीच्या जोरावर KKR ची बल्ले-बल्ले

बोलून बातमी शोधा

KKR
IPL 2021 : मॉर्गन-त्रिपाठीच्या जोरावर KKR ची बल्ले-बल्ले
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इयॉन मॉर्गनचे दमदार अर्धशतक आणि राहुल त्रिपाठीने 32 चेंडूत 7 चौकाराच्या मदतीने केलेल्या 41 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने नरेंद्र मोदी स्टेडियमवरी रात्र गाजवली. पंजाब किंग्जने दिलेले 124 धावांचे लक्ष्य कोलकाताने 5 विकेट राखून आरामात पार केले. मॉर्गनने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. पंजाबला त्यांनी निर्धारित 20 षटकात 9 बाद 123 धावांवर रोखले होते. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इयॉन मॉर्गनने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. लोकेश राहुल आणि मयांक या पंजाबच्या जोडीने डावाला सुरुवात केली. धावफलकावर 36 धावा असताना राहुल माघारी फिरला. त्याने 19 धावा केल्या. शिवम मावीने गेलला आल्या पावली माघारी धाडले.

हेही वाचा: IPL 2021: मिसरुड नसलेल्या पोरानं घेतली गेलची विकेट (VIDEO)

दीपक हुड्डाही नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. निकोलस पूरन मैदानावर स्थिरावतोय असे वाटत असताना चक्रवर्तीने त्याची विकेट घेतली. सुरुवातीला मयांक अग्रवालच्या 31 धावा आणि तळाच्या फलंदाजीत जार्जनने केलेल्या 30 धावांच्या जोरावर पंजाबत्या संघाने निर्धारित 20 षटकात 9 बाद 123 धावांपर्यंत मजल मारली. प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स आणि सुनील नरेनला प्रत्येकी दोन तर शिवम मावी आणि चक्रवर्तीला एक गडी बाद करण्यात यश आले.

हेही वाचा: IPL 2021 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर राहुलचा फ्लॉप शो कायम!

तोकड्या धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाताच्या डावाची सुरुवातही खराब झाली. शुभमन गिल 9 आणि नितीश राणा शून्यावर माघारी फिरला. त्यानंतर राहुल त्रिपाठीने 32 चेंडूत 41 धावांची उपयुक्त खेळी केली. सुनील नरेनला अर्शदीपने खातेही उघडू दिले नाही. आंद्र रसेलच्या रुपात कोलकाताने पाचवी विकेट गमावली. तो 10 धावांवर रन आउट झाला. कॅप्टन इयॉन मॉर्गन 40 चेंडूत नाबदा 47 धावा आणि दिनेश कार्तिकने 6 चेंडूत 12 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.