चूक झाली! अखेर जोकोविचने कबूल केले

Novak Djokovic admitted Breaking Corona Isolation
Novak Djokovic admitted Breaking Corona Isolationesakal

मेलबर्न: जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणारा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) प्रशासनातील संघर्ष अखेर न्यायालयात जाऊन संपला. यानंतर वादाचा सगळा धुरळा खाली बसेल आणि ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये (Australia Open) वाद विरहीत टेनिस सुरु होईल अशी अपेक्षा होती. मात्र नोव्हाक जोकोविचच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एका वादाचा जन्म झाला आहे. (Novak Djokovic admitted Breaking Corona Isolation)

नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic) आपल्या वक्तव्यात मान्य केले की ऑस्ट्रेलियात प्रवेश करतेवेळी सादर केलेल्या कागदपत्रात चूक झाली होती. ही कागदपत्रे त्याच्या एजंटने सादर केली होती आणि याबद्दल त्याने माफीही मागितली असल्याचे जोकोविचने सांगितले. याचबरोबर त्याने डिसेंबरमध्ये ज्यावेळी त्याला कोरोनाची लागण (Novak Djokovic Corona Positive) झाली होती. त्यावेळी त्याने सार्वजनिक कार्यक्रमातही सहभाग घेतल्याच्या आरोपाबाबतही त्याने वक्तव्य केले आहे.

Novak Djokovic admitted Breaking Corona Isolation
'स्लेज मास्टर' ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने मारली पलटी

तो आपल्या वक्तव्यात म्हणतो, 'माझ्या सहाय्यक टीमने माझ्या वतीने ऑस्ट्रेलियात दाखल होताना सादर केलेल्या कागदपत्रात काही तृटी होत्या. ऑस्ट्रेलियात दाखल होण्यापूर्वी केलेल्या प्रवासाबाबतच्या माहितीत काही चुकीचे बॉक्स टिक झाले होते. मी इमिग्रेशन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती. या प्रकरणात माझ्या एजंटने माफी देखील मागितली आहे.'

याचबरोबर नोव्हाक जोकोविचने आपण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) झाल्यानंतरही एका पत्रकाराला मुलाखत दिली आणि फोटोशूटही करुन घेतल्याचे मान्य केले आणि माफी मागितली. जोकोविच म्हणाला, 'ज्यावेळी मी ही मुलाखत संपल्यांनतर घरी विलगीकरणासाठी गेले त्यावेळी माझा निर्णय चुकल्याची मला जाणीव झाली. मला माझी चूक मान्य आहे मी या मुलाखतीची वेळ बदलायला हवी होती.'

Novak Djokovic admitted Breaking Corona Isolation
RSA vs IND Live: बुमराहचा आफ्रिकेला दुसरा धक्का

मात्र जोकोविचने त्याला कोरोनाची लागण झाली असताना देखील सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याच्या आरोपाचे खंडन केले. तो म्हणाला, 'मला कोणतीच लक्षणे नव्हती. मला चांगले वाटत होते. पीसीआर (PCR) चाचणीचे कोणतेही नोटिफिकेशन मला आले नव्हते. मला हा कार्यक्रम झाल्यानंतर मी पॉझिटिव्ह आहे हे समजले.' जोकोविचने त्याची कार्यक्रमाआधी केलेली रॅपिड अँटीजेन टेस्ट (Rapid Antigen Test) निगेटिव्ह आली होती असेही सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com