'स्लेज मास्टर' ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने मारली पलटी | Pat Cummins Comment On Australian Team Sledging | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pat Cummins Comment On Sledging
'स्लेज मास्टर' ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने मारली पलटी

'स्लेज मास्टर' ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने मारली पलटी

क्रिकेट इतिहासात सर्वाधिक स्लेजिंग (Sledging) करणारा संघ म्हणून ऑस्ट्रेलिया (Australia) कुप्रसिद्ध आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने स्लेजिंग बाबत एक वेगळाच पवित्रा घेतला आहे. २०१८ च्या बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये (Australia Cricket) बरेच बदल करण्यात आले. त्यामुळेच यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Series) कोणत्याही प्रकराची शाब्दिक चकमक उडाल्याची घटना घडलेली नाही. याचे सर्व श्रेय कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) आपल्या संघ सहकाऱ्यांना दिले. इंग्लंडच्या खेळाडूंनी उस्मान ख्वाजाच्या दमदार कामगिरीचे कौतुक केले. तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही इंग्लंडकडून चांगली कामगिरी झाल्यानंतर त्यांचे कौतुक केले होते.

हेही वाचा: 'ट्विट वाचलं तेव्हा मी रागात होतो, पण...', सिद्धार्थचा माफीनामा

पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व एक वेगवान गोलंदाज करत आहे. हा मान पॅट कमिन्सला मिळाला आहे. आपल्या नेतृत्वाबाबत पॅट कमिन्स म्हणाला की त्याची नेतृत्वाची शैली इंग्लंडच्या इऑन मॉर्गनच्या जवळ जाणारी आहे. कमिन्स म्हणाला, 'मी इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाकडे एका वेगळ्या नजरेने पाहतो. तो ज्या प्रकारे कर्णधार म्हणून वावरतो ते मला आवडते. तो संघाला एकत्र आणतो. मी आयपीएलमध्ये इऑन मॉर्गनबरोबर काम केले आहे. आमची शैली जवळपास जाते.' (Pat Cummins Comment On Australian Team Sledging)

हेही वाचा: रमीझ राजा उत्पन्नासाठी भारताच्या लागलेत हात धुवून मागे?

कमिन्सने ऑस्ट्रेलियाच्या पारंपरिक स्लेजिग स्ट्रॅटेजीबद्दलही (Sledging Strategy) आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, 'मी या बाबतीत सजग आहे. गेल्या काही वर्षापासून क्रिकेट जगतातील सर्वच संघांना विशेषकरुन ऑस्ट्रेलियाला (Australia Cricket Team) आपला आवाज जरा कमी करण्याची गरज होती. मी आमच्या सर्व खेळाडूंना तुम्ही जसे आहात तसेच राहण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना कोणावरही प्रभाव पाडण्यासाठी काही करण्याची गरज नाही. आधी स्लेजिंग करण्यात यायची म्हणून आता आपणही स्लेजिंग करु असे करण्याची त्यांना गरज नाही. तुम्ही जसे आहात तसेच रहा.'

हेही वाचा: 'Its Ok, पण महिलांना...' सिद्धार्थच्या माफीनाम्यावर सायनाची प्रतिक्रिया

कमिन्सने सांगितले की त्याचा संघ ज्या प्रमाणे खेळत आहे त्याचा त्याला अभिमान आहे. तो म्हणाला की, 'नक्कीच पहिली कसोटी चांगली गेली. स्लेजिंगवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. या ठिकाणी तुम्ही तुमच्या कृतीतून उदाहरण घालून देता. जर कोणाला स्लेजिंगबद्दल बोलायचे असेल तर मी बोलेन. पण इथे, सर्वजण परिपक्व आहेत. ऑस्ट्रेलियातील क्रिकेट चाहत्यांच्या (Australian Cricket Fan) त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे माहीत आहे. मी या सर्वाचे एकटा श्रेय घेणार नाही. संघ सहकाऱ्यांचे यात मोलाचे योगदान आहे.'

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top