Wimbledon 2023 : असा खेळाडू पाहिला नाही; नोवाक जोकोविच

जोकोविचकडून अल्काराझचे भरभरून कौतुक
novak djokovic appreciate carlos alcaraz wins wimbledon hardest way  sport
novak djokovic appreciate carlos alcaraz wins wimbledon hardest way sportsakal

लंडन : तब्बल २३ वर्षांच्या कारकिर्दीत टेनिस कोर्टवर नोवाक जोकोविचनने सर्व प्रकारचा अनुभव घेतला, विजेतेपदांची मालिकाही राखली; परंतु कार्लोस अल्काराझसारख्या खेळाडूचा मी आतापर्यंत कधीच सामना केला नव्हता, असे सांगत जोकोविचने नव्या विम्बल्डन विजेत्याचे कौतुक केले.

विम्बल्डनच्या ऐतिहासिक सेंटर कोर्टवर चार तासांहून अधिक रंगलेल्या सामन्यात अल्काराझने ३६ वर्षीय जोकोविचचा पाच सेटमध्ये पराभव केला आणि प्रथमच विम्बल्डनचा करंडक उंचावला.

पहिला सेट १-६ असा एकतर्फी गमावल्यानंतर अल्काराझने केलेल्या जिगरबाज खेळाचे अधिक कौतुक होत आहे. आपण स्वतः फेडरर आणि नदाल यांचे मिश्रण असलेल्या खेळाडूविरुद्ध खेळत असल्याचे मला जाणवत होते, अशा शब्दांत जोकोविचने अल्काराझचे कौतुक केले.

या पराभवाचे जोकोविचचे दुहेरी स्वप्न भंगले. हा अंतिम सामना त्याने जिंकला असला तर आठ वेळा विम्बल्डन जिंकण्याच्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी तसेच सर्वाधिक २४ ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या मार्गारेट कोर्ट यांच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी त्याला मिळाली असती.

२०१३ पासून ते आता २०२३ पर्यंत जोकोविच विम्बल्डनमध्ये केवळ दोनदाच पराभूत झाला आहे. २०१३ च्या अंतिम सामन्यात अँडी मरेने त्याचा पराभव केला होता; तर काल २० वर्षीय अल्काराझकडून त्याला हार स्वीकारावी लागली.

novak djokovic appreciate carlos alcaraz wins wimbledon hardest way  sport
Monsoon Session 2023 : पहिल्याच दिवशी कळलं, सरकार किती मुजोरपणे वागू शकतं; भास्कर जाधवांची टीका

अल्काराझ ग्रास कोर्टवर इतका चांगला खेळ करेल अशी अपेक्षा मी केली नव्हती, पण टेनिस विश्वात आपण सर्वोत्तम आहोत हे त्याने सिद्ध केले. त्याच्यासारख्या खेळाडूचा मी आतापर्यंत कधीच सामना केला नव्हता हे मी मनापासून मान्य करतो, असे जोकोविच म्हणाला.

गेल्या १२ महिन्यांपासून अल्काराझची बरीच चर्चा होत आहे. आम्ही तिघांचे मिश्रण (फेडरर आणि नदाल आणि स्वतः) असलेला त्याचा खेळ आहे असे मी ऐकत होतो, आज प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला, असे जोकोविचने सांगितले.

novak djokovic appreciate carlos alcaraz wins wimbledon hardest way  sport
Shiv Chhatrapati Sports Awards : शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारात नाशिकचा ‘षटकार’; राज्य सरकारतर्फे घोषणा

दृष्टिक्षेपात अल्काराझ

  • वडील गोन्झालेझ अल्काराझ यांची रियल सोसिदाद क्लब कँपो दि मुरिया येथील टेनिस अकादमीत कार्लोसकडून टेनिसचा श्रीगणेशा.

  • माद्रिद ओपन २०२२ मधील या स्पर्धेत राफेल नदाल आणि जोकोविच यांना पाठोपाठ पराभूत करणारा सर्वांत लहान खेळाडू. या स्पर्धेचे त्याने विजेतेपदही मिळवले.

  • २०२२ मध्ये मेडोस ओपन स्पर्धेत कॅस्पर रूडचा पराभव करून हार्टकोर्ट स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा पीट सॅम्प्रासनंतर (वय १९) लहान खेळाडू.

  • एटीपी रँकिंमध्ये अव्वल क्रमांक मिळवणारा सर्वांत लहान खेळाडू.

  • लहान वयात नऊ विविध अजिंक्यपदे मिळवणारा खेळाडू. बियॉन बोर्ग, नदाल, मँटस विलँडर, बोरिस बेकर आणि आंद्रे आगासी यांच्यापेक्षा एक विजेतेपद कमी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com