
पुरुषांच्या एकेरीमध्ये सर्वाधिक २४ ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलेल्या ३८ वर्षीय नोवाक जोकोविच याच्या खेळावर वयाचा परिणाम होताना दिसू लागला आहे. नोवाक जोकोविच याने जर्मनीच्या जॅन लेनर्ड स्ट्रफ याच्यावर सरळ तीन सेटमध्ये विजय संपादन करीत अमेरिकन ओपन या टेनिस ग्रँडस्लॅममध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, मात्र या स्पर्धेदरम्यान नोवाक जोकोविचला दुखापतींचा सामना करावा लागला.
पहिल्या फेरीमध्ये त्याच्या पायांना जखम झाली. त्यानंतरच्या फेरीमध्ये नोवाक जोकोविचच्या कंबरेला दुखापत झाली अन् जॅन लेनर्ड स्ट्रफविरुद्धच्या लढतीत त्याची मान दुखावली. दुखापतींच्या अडथळ्यानंतरही त्याने ६४व्या ग्रँडस्लॅम उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली, हे विशेष.