
Australian Open 2025: सर्बियाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोविच याच्या शिरपेचात बुधवारी आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जोकोविच याने पोर्तुगालच्या जे. फारिया याच्यावर ६-१, ६-७, ६-३, ६-२ असा चार सेटमध्ये विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅममध्ये नव्या विक्रमांची नोंद झाली.
याप्रसंगी जोकोविचने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या ग्रँडस्लॅममधील सर्वाधिक ४२९ सामन्यांना मागे टाकले. जोकोविचने ग्रँडस्लॅममधील विक्रमी ४३०वा सामना खेळला, हे विशेष.