esakal | #AusOpen2020 : फेडररला हरवत 'मॅटचा बादशाह' पोहोचला फायनलमध्ये!
sakal

बोलून बातमी शोधा

Novak-Djokovic

दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये फेडररने कडवी झुंज दिली. मात्र, त्याला जोरदार प्रतिउत्तर देत उर्वरित दोन्ही सेट आपल्या नावे केले. आणि फेडररचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

#AusOpen2020 : फेडररला हरवत 'मॅटचा बादशाह' पोहोचला फायनलमध्ये!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या रॉजर फेडररला पराभवास सामोरे जावे लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपांत्य फेरीत फेडररला दुसऱ्या मानांकित नोव्हाक जोकोविचने सरळ सेट्मध्ये फेडररला शरणागती पत्करावी लावली. या विजयासह जोकोविचने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत जोकोविचने फेडररला ७-६ (७-१), ६-६, ६-३ असे पराभूत केले आहे.

सामन्यातील पहिला सेट चांगलाच रंगला. दोघांनीही ६-६ असे गुण मिळविले होते. नंतर झालेल्या टायब्रेकरमध्ये जोकोविचने ७-१ अशी बाजी मारत ७-६ने सेट जिंकला. 

दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये फेडररने कडवी झुंज दिली. मात्र, त्याला जोरदार प्रतिउत्तर देत उर्वरित दोन्ही सेट आपल्या नावे केले. आणि फेडररचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

दरम्यान, वर्ल्ड रँकिंगमध्ये टॉपर असलेल्या स्पेनच्या राफेल नदालला ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीएमने धक्का दिला. सव्वा चार तास आणि तीन टायब्रेकपर्यंत त्यांच्यात मॅच रंगली होती. फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये नदालने थीएमला दोनवेळा हरवले होते. त्याची परतफेड थीएमने बुधवारी केली. 

थीएमने ७-६ (७-३), ७-६ (७-४), ४-६, ७-६ (८-६) अशा सेटमध्ये नदालचा फडशा पाडला. याबरोबरच थीएमने नदालचे 20वे ग्रँडस्लॅम पटकावण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.

loading image
go to top