गब्बर इज बॅक! आल्या आल्या हेडन, रुटला टाकले मागे | Shikhar Dhawan surpasses root Matthew Hayden | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shikhar Dhawan surpasses root Matthew Hayden
गब्बर इज बॅक! आल्या आल्या हेडन, रुटला टाकले मागे

गब्बर इज बॅक! आल्या आल्या हेडन, रुटला टाकले मागे

पार्ल : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे दक्षिण आफ्रिका तीन सामन्यांच्या मालिकेत १ - ० ने आघाडीवर आहे. भारताच्या दृष्टीने कालच्या सामन्यातील सकारात्मक बाब म्हणजे दीर्घ काळानंतर कमबॅक करणाऱ्या शिखर धवनने (Shikhar Dhawan) दमदार फलंदाजी करत आपला फॉर्म सिद्ध केला. याचबरोबर विराट कोहलीने देखील शतक नाही मात्र अर्धशतक ठोकून फॉर्ममध्ये परतत असल्याचे संकेत दिले. (Shikhar Dhawan surpasses root Matthew Hayden in the list of most ODI runs)

हेही वाचा: राफेल नदाल, बार्ती, ओसाकाची वाटचाल

शिखर धवनने एकदिवसीय संघात नुसते पुनरागमन केले नाही तर त्याने हे पुनरागमन खास बनवले. ३६ वर्षाच्या या डावखुऱ्या सलामीवीराने पहिल्या सामन्यात ८४ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. भारताकडून ही या सामन्यातील सर्वोच्च खेळी होती. या खेळीत त्याने १० चौकार लगावले. या खेळीबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत मॅथ्यू हेडन (Matthew Hayden), जो रुट (Joe Root) आणि केन विलियमसनला देखील मागे टाकले.

हेही वाचा: ICC T-20 संघात भारताचा एकही खेळाडू नाही

रुटने १५२ एकदिवसीय १४२ डावात ५१.३ च्या सरासरीने ६ हजार १०९ धावा केल्या आहेत. तर हेडनने १६१ सामन्यातील १५५ डाववात ४३.८ च्या सरासरीने ६ हजार १३३ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने १५१ सामन्यात १४४ डावात फलंदाजी करत ४७.५ च्या सरासरीने ६ हजार १७६ धावा केल्या आहेत.

शिखर धवनने (Shikhar Dhawan ODI Runs) कालच्या आपली ७९ धावांच्या खेळी करुन या सर्वांना मागे टाकले. त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६ हजार १८४ धावा झाल्या आहेत. त्याने भारताकडून आतापर्यंत १४६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यातील १४३ डावात फलंदाजी करण्याची संधी त्याला मिळाली. त्याने एकदिवसीय सामन्यात १७ शतक आणि ३४ अर्धशतके ठोकली आहेत.

Web Title: Shikhar Dhawan Surpasses Root Matthew Hayden In The List Of Most Odi Runs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top