
Novak Djokovic pulled out of the Australian Open 2025 semi-final: स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ मधील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीतून माघार घेतली आहे. अॅलेक्झांडर झेव्हरेव्हविरुद्धच्या या लढतीत पहिला सेट एक तास २१ मिनिटांचा राहिला आणि त्यात जर्मनीच्या खेळाडूने पहिला सेट ७-६ ( ७-५) असा टायब्रेकरमध्ये जिंकला. हा सेट संपल्यानंतर लगेचच जोकोविचने चेअर अंपायरशी हस्तांदोलन करत दुखापतीने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.