Wimbledon 2023 : जोकोविचला २४ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची आस

विम्बल्डन २०२३ : अल्काराझवर नजरा
novak djokovic refuses to rest on laurels despite claiming mens record 24th grand slam title
novak djokovic refuses to rest on laurels despite claiming mens record 24th grand slam titlesakal

लंडन : सर्बियाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोविच याने या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन व फ्रेंच ओपन या दोन महत्त्वाच्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकत पुरुष विभागात ऐतिहासिक कामगिरी केली. आता पुरुष विभागात सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपदे त्याच्या नावावर आहेत.

नोवाक जोकोविचला उद्यापासून (ता. ३) सुरू होणाऱ्या विम्बल्डन ग्रँडस्लॅममध्ये अजिंक्यपद पटकावण्याचा ध्यास लागून राहिला असेल. या स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातल्यास मार्गरेट कोर्टच्या सर्वाधिक २४ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची बरोबरी त्याला करता येईल.

novak djokovic refuses to rest on laurels despite claiming mens record 24th grand slam title
NZ vs SL ODI : मैदानातील अंपायर झोपेत! ODI सामन्यात गोलंदाजाने टाकली 11 षटके, अन्...

नोवाक जोकोविचचा जेतेपदापर्यंतचा प्रवास सोपा नसणार आहे. स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराझ हा त्याच्यासमोरील प्रमुख अडथळा असणार आहे. त्याला या स्पर्धेसाठी अव्वल मानांकन देण्यात आले आहे.

novak djokovic refuses to rest on laurels despite claiming mens record 24th grand slam title
ODI World Cup : बीसीसीआयकडून मलमपट्टी; वर्ल्डकपमध्ये स्थान न मिळालेल्या ठिकाणी आंंतरराष्ट्रीय लढती

विक्रमांची संधी

  • विम्बल्डन स्पर्धा जिंकल्यास जोकोविचला मार्गरेट कोर्टच्या विक्रमी २४ ग्रँडस्लॅम जेतेपदाची बरोबरी करता येईल

  • या स्पर्धेत जेतेपद पटकावल्यास जोकोविचला रॉजर फेडररच्या आठ विम्बल्डन जेतेपदांची बरोबरी करता येईल

  • सलग पाच विम्बल्डन जिंकणारा तो तिसरा खेळाडू ठरेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com