

Wimbledon 2026
esakal
लंडन : पंचविसाव्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाची प्रतीक्षा असलेला सर्बियाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोविच याला विम्बल्डन या ग्रासकोर्टवरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील तिसऱ्या फेरीचा अडथळा ओलांडण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. सातव्या मानांकित नोवाक जोकोविच याने २५व्या मानांकित आर्थर रिंडरनेच याचेे कडवे आव्हान चार सेट आणि तीन तास एक मिनिटांत परतवून लावत पुढल्या फेरीत प्रवेश केला.