Novak Djokovic Wimbledon
Novak Djokovic Wimbledonesakal

Wimbledon: जोकोविच 'विम्बल्डन'मध्ये सलग 32 वा सामना जिंकला, ह्युबर्ट हुर्काझवर चार सेटमध्ये मात

Published on

Novak Djokovic Wimbledon : सर्बियाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोविच याची विम्बल्डन ग्रँडस्लॅम या टेनिस स्पर्धेतील विजयी वाटचाल सोमवारीही कायम राहिली. त्याने पोलंडच्या ह्युबर्ट हुर्काझ याच्यावर ७-६, ७-६, ५-७, ६-४ अशी चार सेटमध्ये मात केली आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मागील चार विम्बल्डन स्पर्धा जिंकणाऱ्या जोकोविचचा या स्पर्धेतील सलग ३२ वा विजय ठरला हे विशेष.

Novak Djokovic Wimbledon
Rohit Sharma : एकाच वर्षात रोहितवर उठवले गेले अनेक प्रश्न; हिटमॅनच्या कर्णधारपद धोक्यात

नोवाक जोकोविच व ह्युबर्ट हुर्काझ यांच्यामध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. पहिले दोन्ही सेट ७-६ असे जिंकले. पण हुर्काझ याने तिसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करताना ७-५ अशी बाजी मारली. जोकोविचने चौथ्या सेटमध्ये ६-४ अशी बाजी मारत पुरुषांच्या एकेरीत पुढे पाऊल टाकले. पीट सॅम्प्रासच्या विम्बल्डनमधील ३१ विजयांनाही त्याने मागे टाकले.

Novak Djokovic Wimbledon
Wi VS Ind Test Series : पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहितचा मोठा निर्णय! धोनीच्या लाडक्या खेळाडूला देणार डच्चू

रोहन बोपण्णाचा दुहेरीत विजय

भारताच्या रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेन याच्या साथीने पुरुषांच्या दुहेरीत विजय साकारला. रोहन-मॅथ्यू या जोडीने जेकब फिअर्नले-जोहानस मंडे या यजमान देशाच्या जोडीला पराभूत करीत आगेकूच केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com