Rohit Sharma : एकाच वर्षात रोहितवर उठवले गेले अनेक प्रश्न; हिटमॅनच्या कर्णधारपद धोक्यात

Rohit Sharma
Rohit Sharma

Rohit Sharma : माजी फलंदाज आणि कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे. एकाच वर्षात रोहितवर अनेक प्रश्न उठवले गेले आहेत, त्यामुळे हिटमॅनच्या कर्णधारपद धोक्यात आहे. कर्णधार म्हणून मला रोहितकडून मोठ्या अपेक्षा होत्या, असे म्हणताना गावसकर यांनी संघ व्यवस्थापनानेही उत्तरदायित्व दाखवायला हवे असे कान टोचले.

रोहित शर्माने गेल्या फेब्रुवारीत विराट कोहलीकडून कर्णधारपद स्वीकारले. त्यानंतर मायदेशातील द्विराष्ट्रीय मालिकांमध्ये भारताने भले काही सकारात्मक यश मिळवले असले, तरी महत्त्वाच्या स्पर्धा आणि मालिकांमध्ये भारताला अपयश आले आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारत अंतिम फेरी गाठू शकला नाही, तसेच गेल्या महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यातही पराभव झाला.

Rohit Sharma
Wi VS Ind Test Series : पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहितचा मोठा निर्णय! धोनीच्या लाडक्या खेळाडूला देणार डच्चू

रोहितकडून मला अधिक चांगल्या यशाची अपेक्षा होती. देशातील परिस्थितीत आपल्याला अनुकूल असते, परंतु परदेशात यशस्वी कामगिरी करण्याचे आव्हान असते आणि तेथेच रोहितने मला कर्णधार म्हणून निराश केले आहे. आयपीएलमध्ये १०० पेक्षा अधिक सामन्यांत कर्णधारपदाचा अनुभव असतानाही टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम फेरी गाठता आली नाही, असे गावसकर यांनी म्हटले आहे.

Rohit Sharma
WI vs IND : Hotstar, Sony Liv नाही तर 'या' अ‍ॅपवर फ्रीमध्ये पाहता येणार पहिला कसोटी सामना!

भारतीय संघाचे पराभव होतात त्याचे विश्लेषण संघ व्यवस्थापन करत असते का, असा प्रश्न उपस्थित करून गावसकर म्हणतात, जागतिक कसोटी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचे पोस्ट मार्टम होणे अतिशय गरजचेचे होते. या सामन्यासाठी घेतलेल्या सर्व निर्णायांबद्दल रोहित आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना जबाबदार धरले पाहिजे.

Rohit Sharma
WI vs IND : Hotstar, Sony Liv नाही तर 'या' अ‍ॅपवर फ्रीमध्ये पाहता येणार पहिला कसोटी सामना!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या सामन्यात नाणफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी का स्वीकारली, असा पहिला प्रश्न प्रामुख्याने पुढे येतो. त्यावर कदाचित नाणेफेकीच्या वेळी ढगाळ वातावरण होते असे उत्तर दिले जाऊ शकेल. आखूड टप्प्याचे चेंडू ही ट्रॅव्हिस हेडची कमकुवत बाजू आहे हे तुम्हाला माहीत नव्हते का? पण त्याने ८० धावा केल्यावर आखुड टप्प्याचे चेंडू टाकून काय उपयोग झाला?

ट्रॅव्हिस हेड फलंदाजीस आला तेव्हा समालोचन कक्षात असलेला रिकी पाँटिंग सातत्याने म्हणत होता... त्याला आखूड टप्प्याचे चेंडू टाका. हे प्रत्येकाला माहीत असताना तुम्हाला याबाबत काहीच माहिती कशी नव्हती, असा प्रश्नांचा भडिमार गावसकर यांनी रोहित आणि संघ व्यवस्थापनावर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com