Nz vs Eng Ben Stokes: पैसा वसूल... न्यूझीलंडविरूद्ध हरल्यानंतरही बेन स्टोक्स हे काय म्हणाला

nz-vs-eng test ben-stokes-says-moneys-worth-after-new-zealand-beat-england-by-1-runs-in-wellington cricket news in marathi kgm00
nz-vs-eng test ben-stokes-says-moneys-worth-after-new-zealand-beat-england-by-1-runs-in-wellington cricket news in marathi kgm00

New Zealand Vs England : कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एक अतिशय रोमांचक सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा एका धावेने पराभव केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या संघाला एका धावेने पराभवाचा सामना करावा लागण्याची ही दुसरी वेळ आहे. या पराभवावर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने निराशा व्यक्त केली.

nz-vs-eng test ben-stokes-says-moneys-worth-after-new-zealand-beat-england-by-1-runs-in-wellington cricket news in marathi kgm00
Eng vs Nz Test: शेवटच्या क्षणी न्यूझीलंडने पलटवली बाजी! इंग्लंडचा 1 धावाने लाजिरवाणा पराभव

न्यूझीलंडकडून झालेल्या या पराभवानंतर बेन स्टोक्स म्हणाला की, हा सामना कसोटी क्रिकेट कशी असावी याचे उत्तम उदाहरण आहे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यात भावनांचा जोर कायम होता. मला वाटतं आज सगळ्यांचे पैसे वसूल झाले असतील.

तो पुढे म्हणाला, या खेळाचा शेवटचा अर्धा तास अप्रतिम होता. वेलिंग्टनमधील पराभव नक्कीच निराशाजनक आहे, परंतु चांगली बाब म्हणजे आम्ही 5 पैकी 4 परदेश दौरे जिंकले आहेत.

वेलिंग्टन कसोटीत बेन स्टोक्सची कामगिरी काही खास नव्हती. पहिल्या डावात त्याने 27 धावा केल्या तर दुसऱ्या डावात त्याला 35 धावा करता आल्या. केन विल्यमसन आणि नील वॅगनर हे न्यूझीलंडच्या इंग्लंडविरुद्धच्या विजयाचे हिरो ठरले. विल्यमसनने दुसऱ्या डावात फलंदाजी करत शतक झळकावले, तर वॅग्नरने बॉलने चमत्कार करून सामना फिरवला.

nz-vs-eng test ben-stokes-says-moneys-worth-after-new-zealand-beat-england-by-1-runs-in-wellington cricket news in marathi kgm00
Dhanashree Verma: चहलच्या बायकोचा फोटो अन् टार्गेटवर श्रेयस अय्यर! पब्लिकला आठवला मुरली विजय

दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा चार दिवस जोरदार दबदबा होता. इंग्लंडने पहिल्या डावात 435 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडला केवळ 209 धावा करता आल्या. न्यूझीलंडला फॉलोऑन करावे लागले. येथून न्यूझीलंडने पुनरागमन करत दुसऱ्या डावात 483 धावा केल्या आणि इंग्लंडला 258 धावांचे लक्ष्य दिले. अखेरच्या डावात इंग्लंडला केवळ 256 धावा करता आल्या आणि एका धावेने सामना गमावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com