Dhanashree Verma: चहलच्या बायकोचा फोटो अन् टार्गेटवर श्रेयस अय्यर! पब्लिकला आठवला मुरली विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dhanashree verma-post-compared-shreyas iyer

Dhanashree Verma: चहलच्या बायकोचा फोटो अन् टार्गेटवर श्रेयस अय्यर! पब्लिकला आठवला मुरली विजय

Dhanashree Verma Post Viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना 1 मार्चपासून खेळल्या जाणार आहे. पण त्याआधी टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. टीम इंडियानंतर श्रेयस नुकताच दुखापतीतून परतला आहे. पहिल्या कसोटीतही तो संघाचा भाग नव्हता, पण दिल्ली तो खेळला. आता तिसऱ्या कसोटीपूर्वी तो टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या लग्नात एन्जॉय करताना दिसला.

शार्दुल ठाकूरच्या लग्नाच्या कार्यक्रमात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा श्रेयस अय्यर आणि टीमचे इतर खेळाडूही दिसले. मात्र श्रेयस अय्यरकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले. याचे कारण म्हणजे युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री. धनश्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा, त्याची पत्नी रितिका शर्मा, धनश्री, शार्दुल आणि श्रेयस अय्यर दिसत आहेत. फोटोमध्ये युजवेंद्र चहलला न दिसल्याने चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. इतकंच नाही तर श्रेयस अय्यरबद्दल विविध गोष्टी केल्या जात आहेत.

धनश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये शार्दुल ठाकूरही उपस्थित आहे. पण चाहत्यांनी श्रेयस अय्यरला टार्गेटवर घेतला. एवढेच नाही तर एका चाहत्याने त्याची तुलना भारताचा माजी फलंदाज मुरली विजयशी पण केली. मुरली विजयचा चांगला मित्र दिनेश कार्तिकच्या पत्नीसोबत लग्न केले. तेव्हापासून लोक विजयवर टीका करत आहेत. त्याचबरोबर आता लोकांनी श्रेयसची तुलना विजयसोबत केली आहे.

टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलनंतर आता शार्दुल ठाकूरनेही लग्नगाठ बांधली आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड मिताली परुलकर हिच्याशी मुंबईत लग्न केले. दोघांचे लग्न मराठी रितीरिवाजाने पार पडले. शार्दुलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आले आहेत.