
क्रीडा क्षेत्रासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. जगातील सर्वात वयस्कर सुवर्णपदक विजेते ग्रेग बेल यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी शनिवारी (२५ जानेवारी) अखेरचा श्वास घेतला असल्याचे समजत आहे. ते ऍथलेटिक्समध्ये सर्वाधिक काळ जगलेले सुवर्णपदक विजेते खेळाडू होते.