माफीनाम्यानंतरही लागला क्रिकेट करियरला ब्रेक! नेमकं काय आहे प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ollie roninson

माफीनाम्यानंतरही क्रिकेट करियरला ब्रेक! नेमकं काय आहे प्रकरण

Ollie Robinson Suspended: लॉर्ड्स टेस्टमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून लक्षवेधी पदार्पण करणाऱ्या अष्टपैलू ओली रॉबिन्सनवर निलंबनाची कारवाई झालीये. पदार्पणातील सामना संपताच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. पाच दिवसात त्याची सुरुवात दी एन्डमध्ये बदललीये. पदार्पणाच्या सामन्यात जुन्या वादग्रस्त ट्विटमुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. 2012 आणि 2017 दरम्यान ओली रॉबिन्सन याने वर्णद्वेषी आणि लैंगिक भेदभावासंदर्भात वादग्रस्त वक्तव्ये ट्विटरच्या माध्यमातून केली होती. इंग्लंडकडून पदार्पण केल्यानंतर त्याचे जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यासंदर्भात त्याने माफी देखील मागितली होती. (ollie roninson suspended from all forms of international cricket)

या वादग्रस्त ट्विटसंदर्भातील चौकशी होईपर्यंत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केलीये. जोपर्यंत तपास अहवाल समोर येत नाही तोपर्यंत 27 वर्षीय खेळाडूला इंग्लंडच्या राष्ट्रीय संघातून खेळता येणार नाही.

हेही वाचा: ENGvsNZ: दमदार पदार्पणानंतर गोलंदाजाला जुन्या चुकांनी रडवलं!

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्सच्या मैदानात रंगला होता. तिसरा दिवस पावसाने वाया घालवल्यानंतर हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला. अनिर्णित सामन्यानंतर इसीबीने रॉबिन्सचा मुद्दा निकाली काढण्याचा मोठा निर्णय घेतला. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने परिपत्रक काढून यासंदर्भातील माहिती दिलीये.‘रॉबिन्सन पुढील कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही. त्याला तात्काळ इंग्लंडच्या संघातून बाहेर करण्यात आले आहे. अशी माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने दिलीये.

हेही वाचा: सेरेनाचा खेळ खल्लास! 21 वर्षांच्या पोरीनं रडवलं!

युवा अष्टपैलू खेळाडूने न्यूझीललंड विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात दमदार कामगिरी केली होती. इंग्लंडकडून त्याने 7 विकेट घेतल्या. याशिवाय त्याने 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी देखील केली होती. सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुटने त्याच्या कामगिरीचे कौतुक केले होते. कसोटीसाठी जी क्षमता आवश्यक असते ती या युवा खेळाडूमध्ये दिसून येते, असे रुट म्हणाला होता.

रॉबिन्सन याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या दिवशीच व्हायरल झालेल्या ट्विटवर प्रतिक्रियाही दिली होती. अपरिपक्व असताना माझ्याकडून चुकीचे वर्तन झाले. ही चूक माफ करण्याजोगी नाही, असे त्याने म्हटले होते.

त्याने नेमकी काय भूमिका घेतली होती?

रॉबिन्सन याने आपल्या काही जुन्या ट्विटमध्ये मुस्लिम समाज आणि आशियाई वंशाच्या लोकांच्या विरुद्ध तिरस्काराची भावना व्यक्त करणारे ट्विट केले होते. ज्यावेळी त्याला इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले त्यावेळी त्याचे वादग्रस्त ट्विट व्हायरल झाले. परिणामी इंग्लंड बोर्डाला त्याच्यावर कारवाई करावी लागली.

Web Title: Ollie Roninson Suspended From All Forms Of International

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..