ENGvsNZ: दमदार पदार्पणानंतर गोलंदाजाला जुन्या चुकांनी रडवलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ollie robinson

ENGvsNZ: दमदार पदार्पणानंतर गोलंदाजाला जुन्या चुकांनी रडवलं!

राष्ट्रीय संघाकडून कसोटी खेळण्याची इच्छा प्रत्येक क्रिकेट पाहत असतो. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ओली रॉबिन्सनचे हे स्वप्न न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात पूर्ण झाले. न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज टॉम लॅथमची (23) शिकार करत त्याने कसोटी पदार्पणातील पहिली विकेट मिळवली. रॉस टेलर (14) तर कॉलीन डी ग्रँडहोमला त्याने खातेही उघडू दिले नाही. धावांवर बाद करत त्याने मिळालेल्या संधीच सोनं केलं. धमाकेदार पदार्पण केल्यानंतर ओली रॉबिन्सनने यापूर्वी केलेल्या चुकांची माफी मागितल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्याचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: जेवढे चेंडू बॅटला लागतील तेवढ्या बाईक देईन; अख्तरचं चॅलेंज

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी त्याने दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. मैदानात चांगली कामगिरीनंतर रॉबिन्सन याने 2012 ते 2014 दरम्यान लिंगभेद आणि वर्णभेदासंदर्भातील केलेल्या ट्विटसंदर्भात माफी मागितली. रॉबिन्सनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आल्यानंतर त्याने केलेल्या जुन्या ट्विटची चर्चा रंगली होती. 27 वर्षीय गोलंदाजाने डोळ्यात पाणी आणत चूक कबूल केली.

हेही वाचा: लढवय्यी नाओमी ड्रिप्रेशनलाही हरवेल!

रॉबिन्सन म्हणाला की, जे ट्विट मी केले होते त्याचा मला खेद वाटतो. त्यावेळी मी विचारशून्य होतो. मी चुकीचा वागलो. ती गोष्ट लाजीरवाणी होती. त्यावेळी केलेले कृत्य हे माफी करण्याजोगे नाही, असे त्याने म्हटले आहे. इंग्लिश काउंटीमधील यॉर्कशायर संघातून डच्चू मिळाल्याने हताश होतो. त्याकाळात ट्विटरवर वादग्रस्त भूमिका मांडल्याचा उल्लेखही त्याने केलाय.

इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात चांगल्या कामगिरीची चर्चा होण्याऐवजी माझ्या जुन्या गोष्टी उकरण्यात आल्या. वाईट कृत्याची चांगल्या गोष्टीवर पाणी फेरले, असेही त्याने मान्य केले. मागील चुकांमध्ये सुधारणा करुन त्याची अंमलबजावणी करण्यावर भर देत आहे, असेही तो म्हणाला.

Web Title: Engvsnz Ollie Robinson Apologises For Posting Racist And Sexist Comments On Twitter As A

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..