Virdhawal Khade : 'माझी भारतातील ही शेवटची स्पर्धा..'; ऑलिम्पियन जलतरणपटू वीरधवलने जाहीर केली निवृत्ती

कधीतरी तुम्ही मला प्रशिक्षकाच्या भूमिकेत पाहू शकाल.
Olympian swimmer Virdhawal Khade Retirement
Olympian swimmer Virdhawal Khade Retirementesakal
Summary

वीरधवल याने २०१० मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत ५० मीटर बटरफ्लाय शर्यतीत ब्राँझपदक जिंकले.

पणजी : कारकिर्दीतील पहिले राष्ट्रीय पदक २००१ मध्ये गोव्यातच जिंकले, आता याच राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील (National Sports Competition) पदकासह देशातील स्पर्धात्मक जलतरणातून निवृत्त होत असल्याची घोषणा कोल्हापूरचा अनुभवी ऑलिम्पियन जलतरणपटू वीरधवल खाडे (Olympian Swimmer Virdhawal Khade) याने येथे केली.

‘‘मी मनाने अजूनही तरुण आहे; परंतु शरीराला थकवा जाणवत असल्याचे मला वाटते,’’ असे सांगत वीरधवलने निवृत्ती जाहीर केली. गोव्यात सध्या ३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. कांपाल येथे स्पर्धेतील जलतरणात वीरधवल याने मंगळवारी संध्याकाळी पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. त्याने नोंदविलेली २२.८२ सेकंद ही स्पर्धेतील विक्रमी वेळ ठरली.

Olympian swimmer Virdhawal Khade Retirement
Government Schools : आता राज्यातील सर्व सरकारी शाळांना मिळणार मोफत वीज, पिण्याचं पाणी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महिलांच्या ५० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत वीरधवलची पत्नी ऋतुजा खाडे हिनेही सुवर्णपदक जिंकताना २६.४२ सेकंद असा नवा स्पर्धा विक्रम नोंदविला. खाडे दाम्पत्याचे हे यश लक्षवेधी ठरले. वयाच्या ३२ व्या वर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर वीरधवल समाधानाने निवृत्त होऊ इच्छित आहे. ‘‘माझी ही भारतातील शेवटची स्पर्धा आहे.

Olympian swimmer Virdhawal Khade Retirement
Ratnagiri : पोचरीच्या सुपुत्राचा NASA मध्ये डंका; ओंकार धामणेनं केलं संधीचं सोनं, शोधनिबंध आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर

कधीतरी तुम्ही मला प्रशिक्षकाच्या भूमिकेत पाहू शकाल; मात्र ही माझी शेवटची स्पर्धात्मक स्पर्धा आहे, हे निश्चित,’’ असे वीरधवलने सांगितले. भारतीय जलतरणात तो ‘वीर’ या नावाने ओळखला जातो. दुखापतीतून सावरत असताना त्याने मुंबईत नवोदितांना मार्गदर्शन केलेले आहे, त्या अनुभवाच्या जोरावर तो आता प्रशिक्षक बनू इच्छितो.

कारकिर्दीतील वर्तुळ पूर्ण

‘‘२००१ मध्ये गोव्यातील मडगाव येथे ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मी पहिले सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर मी कितीतरी राष्ट्रीय पदके जिंकली, नवे विक्रम प्रस्थापित केले. आता कारकिर्दीतील वर्तुळ पूर्ण होत आहे. गोव्यातच झालेल्या माझ्या शेवटच्या राष्ट्रीय स्पर्धेत मी सुवर्णपदक जिंकले आहे,’’ असे सांगत वीरधवलने स्पर्धात्मक निवृत्तीचा इरादा स्पष्ट केला. महाराष्ट्रासाठी पदक जिंकणे नेहमीच आपल्यासाठी खास ठरल्याचे त्याने नमूद केले.

Olympian swimmer Virdhawal Khade Retirement
Karnataka Politics : काँग्रेस हायकमांडनं 'हा' विषय घेतला गांभीर्यानं, सुरजेवालांनी थेट आमदार, मंत्र्यांनाच धरलं धारेवर

आशियाई पदक विजेता आणि ऑलिम्पियन

वीरधवल याने २०१० मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत ५० मीटर बटरफ्लाय शर्यतीत ब्राँझपदक जिंकले. तेव्हा तब्बल २४ वर्षांनंतर भारताला एशियाड जलतरणात पदक मिळाले होते. वीरधवल २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्येही सहभागी झाला होता, तेव्हा तो ऑलिम्पिक खेळणारा सर्वांत युवा भारतीय जलतरणपटू ठरला होता. त्यानंतर २०१८ मध्ये जबरदस्त पुनरागमन करताना त्याने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविली. गुडघ्याच्या दुखापतीमुळे कोल्हापूरच्या या जलतरणपटूस कारकिर्दीतील अत्युच्च शिखरावर असताना जलतरणापासून दूर राहावे लागले होते, मात्र दृढनिश्चयाच्या बळावर तो पुन्हा जलतरण तलावात उतरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com