Olympic bronze medalist Swapnil Kusaleesakal
क्रीडा
Olympic Bronze Medalist स्वप्नील कुसाळेचे नाव ऐतिहासिक भवानी मंडपातील क्रीडास्तंभावर कोरले जाणार
Olympic bronze medalist Swapnil Kusale : ऑलिंपिकसह जागतिकस्तरावर नाव केलेल्या सहा खेळाडूंची नावे भवानी मंडपातील क्रीडास्तंभावर कोरली आहेत.
Summary
७२ वर्षांनी अशी देदीप्यमान कामगिरी कांबळवाडी (ता. राधानगरी) च्या स्वप्नील कुसाळेने करून दाखविली. त्याचा गौरव म्हणून स्वप्नीलचे नाव या क्रीडास्तंभावर कोरण्यात येणार आहे.
कोल्हापूर : क्रीडानगरी कोल्हापूरला ऑलिंपिकचे कांस्य पदक (Olympic Bronze Medal) स्वप्नील कुसाळेने (Swapnil Kusale) ७२ वर्षांनी मिळवून दिले. अशी कामगिरी केलेल्या स्वप्नीलचे नाव ऐतिहासिक भवानी मंडपातील (Bhavani Mandap) मानाच्या क्रीडास्तंभावर कोरले जाणार आहे. त्याचे आज (ता. २१) अनावरण आहे.