
श्यामकेंट (कझाकस्तान): भारतीय नेमबाजांची आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतील पदकांची लयलूट मंगळवारीही कायम राहिली. पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदक पटकावणारी मनू भाकर हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ब्राँझपदक पटकावले. रश्मिका सहगल हिने ज्युनियर महिला विभागात एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली.