Neeraj Chopra receives honorary Lieutenant Colonel rank
नवी दिल्ली: ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याचा लेफ्टनंट कर्नल (मानद) पदग्रहण समारंभ बुधवारी पार पडला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सेनाध्यक्ष जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात नीरजला हा सन्मान देण्यात आला. नीरज २६ ऑगस्ट २०१६ रोजी नायब सुभेदार पदावर ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून भारतीय सैन्यात रुजू झाला होता.