VIDEO : भवानी देवी लढली अन् पराभूत होऊनही जिंकली!

सोशल मीडियावर तिच्या लढवय्या वृत्तीला विशेष दाद मिळत आहे.
 Bhavani Devi
Bhavani DeviTwitter

तलवारबाजीतील आपले कसब दाखवत भवानी देवीनं दिमाखात सुरुवात केली. ऑलिम्पिकच्या रिंगणात तलवार मिरवणारी ती पहिली महिला आहे. 26 जुलैला तिने जी कामगिरी केलीये ती वर्षांनुवर्षे स्मरणात राहिल. पहिल्या फेरीत विजय नोंदवत तिने ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताकडून नवा इतिहास रचला. तलवारबाजीत ऑलिम्पिकमध्ये सामना जिंकण्याचा विक्रम तिच्या नावे झालाय. त्यामुळेच दुसऱ्या फेरीतील अपयशानंतरही तिच्या कामगिरीचं कौतुक होताना दिसते. सोशल मीडियावर तिच्या लढवय्या वृत्तीला विशेष दाद मिळत आहे. (Olympics 2020 You Know About Bhavani Devi 1st Indian Fencer At Olympics Watch Video)

 Bhavani Devi
Tokyo Olympics Day 4 : ऑलिम्पिकच्या मैदानात कुठे काय सुरुय

ऑलिम्पिकमधील सलामीच्या लढतीत दिमाखात तलवार मिरवुन दाखवत तिने जगाच्या मानाच्या स्पर्धेत आपल्यातील क्षमतेची झलक दाखवली. 1896 पासून ऑलिम्पिक स्पर्धेत तलवारबाजीचा समावेश आहे. आतापर्यंत भारताचा एकही खेळाडू या प्रकारात पात्र ठरला नव्हता. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्यावर लक्षवेधी ठरलेल्या भवानीने पहिल्या सामन्यात विजय नोंदवत तलवारबाजीतील भारताच्या ताकदीची जगाला ओळख करुन दिलीये.

भवानी देवी तलवारबाजी क्रीडा प्रकारातील जागतिक क्रमवारीत 42 व्या स्थानी असलेल्या भवानी देवीचा प्रवास थक्क करणारा असाच आहे. 2009 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत तिने कांस्य पदकाची कमाई केली होती. आंतरराष्ट्रीय ओपन, कॅडेट आशियाई चॅम्पियनशिप, अंडर 23 अशा स्पर्धा तिने गाजवल्या आहेत. 23 वर्षांखालील गटात आशियाई स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय आहे.

 Bhavani Devi
IPL पुन्हा येणार; MI vs CSK मेगा लढतीने होणार सुरुवात

भवानी देवी आणि राहुल द्रविड कनेक्शन

भवानी देवी त्या मोजक्या 15 खेळांडूपैकी एक आहे ज्यांना राहुल द्रविडच्या फाउंडेशनने मदत केलीये. भवानी देवीचा जन्म तामिळनाडूतील चेन्नईचा. वयाच्या 10 व्या वर्षी तिची पावले खेळाच्या दिशेने वळली. ऑलिम्पिकला रवाना होण्यापूर्वी एका मुलाखतीमध्ये भवानी देवीने तलवारबाजीत आल्याचा योगायोग सांगितला होता. क्रीडा क्षेत्राची निवड करण्यासाठी प्रवेश घेतलेल्यांचा वेगवेगळे गट करण्यात आले होते. यातून पाच वेगवेगळ्या खेळात निवड करण्यात येणार होती. ज्यावेळी भवानी देवीचा नंबर आला त्यावेळी तलवारबाजीचा स्लॉटच शिल्लक होता. तिच्यापुढे अन्य कोणत्याही खेळाचा पर्याय नव्हता. पर्याय नसताना निवडलेल्या खेळात आवड जोपासत तिने आता भारतासाठी सुवर्ण इतिहास रचलाय. केवळ एक सामना जिंकून तिने आपल्या तलवारीतील ताकद दाखवलीये. तिच्या या कामगिरीमुळे तलवारबाजी क्रीडा प्रकारात अच्छे दिन येण्याचे संकेतच मिळाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com