ऑलिम्पिक पदक विजेत्या धावपटूचे २९ व्या वर्षी अपघातात निधन

Deon Lendore Died In Car Accident
Deon Lendore Died In Car Accidentesakal

लंडन ऑलिम्पिक गेम्समध्ये ४ बाय ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावणाऱ्या त्रिनिदाद आणि टोबागोच्या डेओन लेंडोरचे (Deon Lendore) कार अपघातात (Car Accident) निधन झाले. तो २९ वर्षाचा होता. त्याच्या कारला टेक्सासमध्ये अपघात झाला होता. लेंडोरने तीन ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. तो २०२० मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्येही सहभागी झाला होता.

Deon Lendore Died In Car Accident
'Its Ok, पण महिलांना...' सिद्धार्थच्या माफीनाम्यावर सायनाची प्रतिक्रिया

टेक्सासच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाने सांगितेल की लेंडो मिलाम काऊंटी येथे त्याची कार घेऊन चालला होता. त्यावेळी त्याच्या कारला अपघात झाला. टेक्सासच्या डीपीएसने लेंडोरला जागेवरच मृत घोषित केले.

Deon Lendore Died In Car Accident
'स्लेज मास्टर' ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने मारली पलटी

लेंडोरने २०१५ च्या जागतिक स्पर्धेत ४ बाय ४०० मीटर स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. याचबरोबर त्याने इनडोअर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत तीन कांस्य पदके जिंकली होती. लेंडोरच्या अपघाती मृत्यूनंतर ऑलिम्पिक स्पर्धक ग्वेन बेरी (Gwen Berry) यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. ते लिहितात, 'मी गेल्या वर्षी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे जगण्याचे महत्व. तुम्हाला जे वाटते ते करा. तुम्हाला कोणावर प्रेम करायचे आहे त्याच्यावर करा. फक्त जगण्यासाठी मरु नका. जगा आणि मग मरा. यानंतर मी जास्त आनंदी रहायला लागलो.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com