VIDEO : फ्लिंटॉफ नडला; युवीनं ब्रॉडला झोडला!

14 वर्षांपूर्वीची युवीच्या अविस्मरणीय फटकेबाजीची झलक
Yuvraj Singh
Yuvraj Singh

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू फलंदाज युवराज सिंग याने वर्ल्ड कप स्पर्धेत 6 चेंडूत 6 षटकार खेचण्याचा पराक्रम करुन दाखवलाय. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने स्टुअर्ट बोर्डची धुलाई केली होती. 14 वर्षांपूर्वी 19 सप्टेंबर 2007 रोजी युवीनं टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत धमाका केला होता. दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात त्याने रचलेल्या ऐतिहासिक कामगिरीला बीसीसीआयने उजाळा दिलाय. 14 वर्षांपूर्वीची युवीच्या अविस्मरणीय फटकेबाजीची झलक दाखवणारे खास फोटो बीसीसीआने अधिकृत ट्विट अकाउंटवरुन शेअर केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या टी20 मध्ये 6 चेंडूत 6 षटकार मारणारा युवराज सिंग हा पहिला फलंदाज आहे. युवराज सिंगने या षटकाराच्या मदतीने 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद फिफ्टी ही युवीच्या नावेच आहे. आजही हा रेकॉर्ड त्याच्या नावे कायम आहे. युवीच्या वादळी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने इग्लंडला 18 धावांनी पराभूत केले होते.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर

डरबनच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात रॉबिन उथप्पाची विकेट पडल्यानंतर युवराज सिंग मैदानात उतरला होता. युवी मैदानात उतरला त्यावेळी भारताच्या धावफलकावर 16.4 षटकात 3 बाद 155 धावा होत्या. गौतम गंभीर 58, विरेंद्र सेहवाग 68 आणि उथप्पा 6 धावा करुन तंबूत परतले होते.

फ्लिंटॉफलासोबतचा ड्रामा अन् स्टुअर्ट ब्रॉडची धुलाई

भारताच्या डावातील 19 व्या षटकात युवराज सिंगने पहिल्या चेंडूवर डीप मिड विकेट आणि लॉन्ग ऑनच्या वरुन षटकार खेचला. दुसऱ्या चेंडूवर लेग साइड आणि तिसऱ्या चेंडूवर एक्स्टा कव्हरला अप्रतिम फटका खेळत षटकारांची हॅटट्रिक पूर्ण केली. सलग तीन षटकार खेचल्यानंतर दबावात आलेल्या ब्रॉडने राउंड द विकेट गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. युवीने तोच सपाटा कायम राखत पुढच्या तीन चेंडूवर तीन षटकार खेचले. ब्रॉडची धुलाई करण्यापूर्वी फ्लिंटॉफ आणि युवी यांच्यात बाचाबाची झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. फ्लिंटॉफसोबत झालेल्या शाब्दिक चकमकीचा रागच जणून ब्रॉडवर निघाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com