esakal | भारताच्या विजयात हरिका चमकली
sakal

बोलून बातमी शोधा

भारताच्या विजयात हरिका चमकली

भारताच्या विजयात हरिका चमकली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-रघुनंदन गोखले

चेईत ऑनलाइन सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताने युक्रेनचा टायब्रेकरमध्ये ५-१ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. ज्युनियर हरिकाने मिळवलेले तीन विजय भारतासाठी मोलाचे ठरले. निहाल सरीनचेही यश दखलपात्र ठरले.

आजच्या या उपांत्यपूर्व फेरीत भारताने पहिल्या राऊंडमध्ये ४-२ अशी बाजी मारली. दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र भारताचा २.५-३.५ असा पराभव झाला. त्यामुळे घेण्यात आलेल्या टायब्रेकरमध्ये भारतीयांनी आपली ताकद दाखवत ५-१ अशी बाजी मारली. तिन्ही राऊंडमध्ये विजय मिळवणारी हरिका भारताची एकमेव खेळाडू ठरली. पहिल्या राउंडमध्ये निहालचा प्रतिस्पर्धी गालपेरीन १५ मिनिटांच्या डावात इंटरनेट अडचणीमुळे १३ मिनिटे उशिरा आला. त्याचा फायदा निहालला झाला. त्यानंतर टायब्रेकरमध्येही निहालच्या याच प्रतिस्पर्ध्याच्या इंटरनेटमध्ये खंड पडला होता.

पहिल्या राउंडमध्ये कर्णधार आनंदने इव्हानचुकविरुद्धची लढत पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना बरोबरीत सोडवून सावध सुरुवात करुन दिली होती. हरिकृष्णा आणि हंपी यांचे डावही बरोबरीत सुटले मात्र निहाल आणि हरिका यांचे विजय आत्मविश्वास उंचावणारे ठरले.

अशी झाली कामगिरी

  • वासिल इव्हानचुकविरुद्ध आनंदची दोन्ही फेऱ्यांत बरोबरी

  • दुसरा राउंड आणि टायब्रेकरमध्ये निहालचे विजय

  • निहालचे दोन; तर हरिकाचे तीन विजय

  • हरिका, निहालसह प्रग्गान्नंधाचीही चमक

  • विदित गुजरातीचा एक पराभव, एक बरोबरी

loading image
go to top