VIDEO : टीम इंडियात निवड होताच मुकेश कुमारचे 'देख रहा हैं ना बिनोद' सेलिब्रेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pacer Mukesh Kumar Dekh Raha Hai Binod Memes Celebration After Selected In Team India For South Africa ODI Series

VIDEO : टीम इंडियात निवड होताच मुकेश कुमारचे 'देख रहा हैं ना बिनोद' सेलिब्रेशन

Mukesh Kumar Team India : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात येत्या 6 ऑक्टोबरपासून तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात दोन नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. आयपीएल स्टार रजत पाटीदार आणि पश्चिम बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली.

हेही वाचा: Jasprit Bumrah : स्टार्क.. IPL.. BBL वरून बुमराहला कानपिचक्या; #Starc होतोय ट्रेंड

दरम्यान, भारतीय संघात निवड झालेला मुकेश कुमार ज्यावेळी संघाची घोषणा झाली त्यावेळी उर्वरित भारत संघाकडून खेळत होता. ज्यावेळी त्याला संघनिवडीबाबत समजले त्यावेळी तो संघासोबत हॉटेलमध्ये परत जात होता. त्याच्या निवडीची माहिती मिळताच संघ सहकाऱ्यांनी बसमध्येच जल्लोष करण्यास सुरूवात केली. या जल्लोषाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये संघ सहकारी सर्फराज खान मुळचा बिहारचा असलेल्या मुकेश कुमारला प्रसिद्ध वेब सिरीज पंचायत मधील 'देख रहा हैं ना बिनोद' हा डायलॉग म्हणत संघात निवड झाल्याचे सांगत आहे. बाकी खेळाडूंनी देखील हिप हिप हुर्रे म्हणत मुकशेचा उत्साह वाढवताना दिसत आहेत.

हेही वाचा: Jonny Bairstow : बेअरस्टोचा तीन ठिकाणी मोडला पाय; 2023 पर्यंत काही मैदानावर येत नाही

मुकेश आणि रजत पाटीदार या नव्या चेहऱ्यांच्या संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. तर या संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर आहे. सध्या जो दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा तिसरा टी 20 सामना खेळत आहे. भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या मुकेशने बंगालकडून गोलंदाजी करताना निवड समितीला प्रभावित केलं. त्यानंतर त्याने न्यूझीलंड अ विरूद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला. त्यानंतर त्याने इराणी कपमध्ये देखील दमदार गोलंदाजी केली.