esakal | IPL 2021: जाडेजा पाहतोय धोनीचा वारसदार होण्याचं स्वप्न!
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021

IPL 2021: जाडेजा पाहतोय धोनीचा वारसदार होण्याचं स्वप्न!

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) संघ कसून सराव करत आहे. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ यंदाच्या हंगामातील प्रबळ दावेदार मानला जात आहे. दिल्ली कॅपिटल्स पाठोपाठ चेन्नईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईचा संघ कशी कामगिरी करणार यासोबतच धोनीनंतर संघाचा कर्णधार कोण? हा देखील चर्चेचा विषय ठरत असतो. उर्वरित हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच रविंद्र जाडेजामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

रविंद्र जाडेजाने खुद्द चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून कमेंट करताना त्याने चेन्नईचा कर्णधार होण्याची भावना व्यक्त केली होती. पण त्याने पुन्हा हे ट्विट डिलिट केले आहे. चेन्नईच्या चाहत्यांनी मात्र जाडेजाच्या कमेंटचा स्क्रीन शॉट काढून घेतला आणि तो चांगलाच व्हायरल होताना दिसतो.

हेही वाचा: IPL पूर्वी MI च्या ओपनरचा धमाका; आफ्रिकेनं उडवला लंकेचा धुव्वा

सीएसके फॅन्स आर्मी नावाच्या चेन्नई सुपर किंग्जच्या माध्यमातून धोनीनंतर संघाचे नेतृत्व कोणाला द्यावे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रविंद्र जाडेजानं कमेंट केली. रविंद्र जाडेजाने 8 अशी कमेंट केली. रविंद्र जाडेजा 8 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळते.

हेही वाचा: CPL 2021 : पोलार्डचा संघ आउट; वजनदार माणसाच्या संघान गाठली फायनल!

त्यामुळे तो धोनीचा वारसदार होण्याची स्वप्न पाहत असल्याचे स्पष्ट झाले. जाडेजाने अवघ्या 2 मिनिटात आपली कमेंट डिलीट केली. पण चेन्नईच्या चाहत्यांनी त्याच्या कमेंटचा स्क्रीनशॉट काढला. जाडेजाच्या नावाला चाहत्यांनी पसंतीही दिल्याचे पाहायला मिळाले. 7 क्रमांकानंतर 8 क्रमांकच येतो, अशा शब्दांत जाडेजा योग्य पर्याय असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगल्याचे पाहायला मिळाले.

loading image
go to top