PAK vs AUS : रावळपिंडीतील सामने आता लाहोरच्या मैदानात रंगणार

Pak vs Aus ODIs T20I
Pak vs Aus ODIs T20I Sakal

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 29 मार्च पासून रंगणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे आणि टी 20 मालिकेत बदल करण्यात आला आहे. रावळपिंडीच्या मैदानात रंगणारे सामने आता कराचीच्या मैदानात स्थलांतरित करण्यात आले आहेत. इस्लामाबादमधील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. पाकिस्तान मंत्री शेख रशीद अहमद यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. (Pak vs Aus ODIs T20I shifted from Rawalpindi to Lahore amidst political tension)

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ODI आणि T20I मालिका लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार आहेत. द्विपक्षीय संघातील कसोटी मालिकेतील अखेरचा सामनाही याच मैदानात रंगणार आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना रावळपिंडीच्या मैदानातच खेळवण्यात आला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता. रावळपिंडिच्या खेळपट्टीवर चांगलीच टीका झाली होती. ही खेळपट्टी सरासरीपेक्षाही खराब असल्याचा शेरा आयसीसीने दिला होता.

Pak vs Aus ODIs T20I
ठाकूर तुसी ग्रेट हो! रहाणे-रोहित शर्माला केलं बॉडीगार्ड

पाकिस्तान सरकारमधील मंत्री अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, "राजधानीमधील राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर रावळंपिंडीतील सामने हे लाहोरमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Pak vs Aus ODIs T20I
VIDEO: रोहित शर्मा होळीच्या शुभेच्छा देताना रितिका वैतागली

एएफपीच्या वृत्तानुसार, कोणत्याही संघातील खेळाडूला धमकी वैगेरे देण्यात आलेली नाही. इस्लामाबादमध्ये सरकारविरोधात अंदालन करण्यात येत आहे. या घटना लक्षात घेऊन सुरक्षिततेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सामन्याचे स्थळ बदलण्यात आले आहे. पाकिस्तानमधील स्थानिक प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, पंतप्रधान इमरान खान यांच्याविरोधात संसदेत लवकरच अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com