
VIDEO: रोहित शर्मा होळीच्या शुभेच्छा देताना रितिका वैतागली
नवी दिल्ली: भारतीय संघातील सर्व खेळाडू हे श्रीलंकेविरूद्धची मालिका संपल्यानंतर त्यांच्या त्यांच्या आयपीएल (IPL 2022) संघात दाखल झाले आहेत. सध्या सर्व संघ आयपीएलच्या 15 व्या हंगामाची जोरदार तयारी करत आहे. हे सर्व खेळाडू संघाच्या बायोबबलमध्ये दाखल झालेत. दरम्यान, होळीचा सण आल्याने अनेक स्टार खेळाडू आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र या रोहित ज्या प्रकारे होळीच्या शुभेच्छा देत होता त्यावरून त्याची पत्नी रितिका जाम वैतागली.
हेही वाचा: Premier League: फुटबॉल सामन्यादरम्यान गळा गोलपोस्टला बांधून अनोखे आंदोलन
रोहित शर्माने आपल्या इन्स्टाग्राम (Rohit Sharma Instagram) अकाऊंटवरून होळीच्या शुभेच्छांना देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याच्या सोबत त्याची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) देखील दिसते. मात्र रोहित शर्माने आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देताना अनेक रिटेक घेतले. या रिटेकचाच व्हिडिओ रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून शेअर करत अखेर चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. या व्हिडिओला त्याने 'मी फक्त सर्वांना हॅप्पी होली म्हणू इच्छितो. ज्यावेळी तुम्ही होळीला दंगामस्ती करत असाल त्यावेळी आपल्या फरी फ्रेंड (पाळीव प्राणी) यांचाही विचार करा. त्यांना रंग लागणार नाही याची काळजी घ्या.' असे कॅप्शन देत चाहत्यांना एक आवाहनही केले.
हेही वाचा: भारताचे शेर ढेर होत असताना 20 वर्षाच्या लक्ष्यने दिला सुखद धक्का
आयपीएलच्या सर्व संघांनी सराव सुरू केला असून रोहित शर्मा देखील मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) पल्टनमध्ये सामील झाला आहे. यंदा रोहित शर्मा हा संपूर्ण नव्या मुंबई इंडियन्सच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबई इंडियन्स ही आयपीएल इतिहासातील एक सर्वात यशस्वी टीम आहे. या सर्व यशाचे श्रेय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक जहीर खानने रोहित शर्माला दिले.
Web Title: Rohit Sharma Wishes Happy Holi To Fans But Ritika Sajdeh Annoyed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..